Baramati: जिल्हा गुणवंत शिक्षक निवड प्रक्रियेबद्दल शिक्षकांमध्ये नाराजी

सन 2022 पूर्वी पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेल्या प्रत्येक शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या तपासणी समिती मार्फत वर्ग व कामाची तपासणी होऊन गुणवंत शिक्षकांची नावे निश्चित केली जात.
teacher
teacher Sakal
Updated on

बारामती - जिल्हा गुणवंत शिक्षक निवड प्रक्रीयेमध्ये केलेल्या बदलाने शिक्षकांत नाराजीची भावना आहे. या बाबत प्रशासनाने सकारात्मक बदल करण्याची मागणी होत आहे.

पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग दरवर्षी 5 स्पटेंबर रोजी शिक्षक दिना निमित्त जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करते.

teacher
Education : शिक्षणातील कामगिरीत महाराष्ट्र राज्य आठव्या स्थानी; एक हजारपैकी केवळ ५८३.२ गुण

सन 2022 पूर्वी पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेल्या प्रत्येक शिक्षकांची जिल्हा परिषदेच्या तपासणी समिती मार्फत वर्ग व कामाची तपासणी होऊन गुणवंत शिक्षकांची नावे निश्चित केली जात. मागील दोन वर्षापासून या पद्धतीत जिल्हा परिषद शिक्षण विभागाने बदल केला आहे.

जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुरस्कार प्रस्तावासाठी लिंक देत आहे. लिंकद्वारे ज्या शिक्षकांनी जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव दिले आहेत त्यांची तालुकास्तरावर तपासणी करून तीन नावे जिल्हा परिषदेला कळवली जात आहेत.

teacher
Education Board : दहावी-बारावी परीक्षेच्या धोरणात्मक निर्णयाला हरताळ; निकालापूर्वीच 'या' अभ्यासक्रमाचे प्रवेश उरकले जाणार

पंचायत समिती प्रशासना मार्फत ज्या तीन शिक्षकांची नावे जिल्हा परिषदेला कळवली जातात फक्त त्यांचीच जिल्हा परिषद तपासणी समितीमार्फत तपासणी होऊन त्यातून दोन नावे निश्चित केली जात आहेत.

जिल्हा परिषदेने अवलंबिलेल्या या धोरणामुळे चांगले काम करणाऱ्या अनेक गुणवंत शिक्षकांवर अन्याय होत आहे. सुरुवातीच्या टप्प्यातील तपासणीचे अधिकार तालुकास्तरावर दिल्यामुळे त्यात व्यक्ती सापेक्षता येत आहे.

teacher
Pune News : मूर्ती विक्रेत्यांसाठी जागा निश्‍चीत करण्याचा पुणे महापालिकेला विसर

जिल्हा परिषदेच्या या धोरणाबाबत पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेल्या अनेक गुणवंत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुणवंत शिक्षक पुरस्कार निवड प्रक्रियेत पारदर्शकता यावी याकरिता पूर्वीप्रमाणे पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेल्या सर्वच शिक्षकांच्या कामाची तपासणी जिल्हा परिषद तपासणी समितीमार्फत व्हावी व त्यातून गुणवंत शिक्षकांची नावे निश्चित केली जावीत अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे.

प्रशासनाने या बाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष नारायण कांबळे व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड यांनी केली आहे.

teacher
INDIA Alliance Meeting Mumbai : इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचे 4 ठराव; आघाडीच्या एकसंधतेसाठी...

"पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग गुणवंत शिक्षक पुरस्कारा बरोबर शिष्यवृत्ती पुरस्कार देते. शिष्यवृत्ती परीक्षेत ज्या शाळेचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत अशा शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांना शिष्यवृत्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

सन 2022 मध्ये शिष्यवृत्ती पुरस्कार दिले गेले नाहीत. यंदा सन 2022 व 2023 मधील शिष्यवृत्ती पुरस्कार देण्यात यावेत."

नारायण कांबळे- अध्यक्ष, पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.