लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे कल हाती येत आहेत. अशातच बारामतीचे कल समोर येत आहेत. बारामतीची लढत चुरशीची दिसून येत आहेत. बारामतीमध्ये पहिल्या फेरीचे आकडे हाती आले असून सुप्रिया सुळे सध्या आघाडीवर असल्याचे दिसून येत आहेत. पहिल्या फेरीमध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
बारामतीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. भाजपच्या मदतीने अजित पवार यांनी बारामतीमध्ये पूर्ण ताकद पणाला लावली होती. सुनेत्रा पवारच रिंगणात असल्याने अजित पवारांनी अगदी बारामतीच्या कानाकोपऱ्यापर्यंत प्रचार केला होता. मात्र, बारामतीकरांनी अजितदादांना साथ न देता शरद पवारांना साथ दिल्याचे चित्र पहिल्या फेरीत दिसून येते आहे.
बारामतीत सुप्रिया सुळे यांनी २६ हजारांनी आघाडी घेतली आहे. तर सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात लागणाऱ्या निकालाकडे राज्यासह संपुर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यामुळे आणि एकाच घरातील सदस्यांमध्ये होणाऱ्या लढतीमुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली. पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून कोण दिल्लीला जाणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
यावर्षीची लोकसभा निवडणूक ही अनेक गोष्टींनी महत्त्वाची ठरवणारी, अशी ऐतिहासिक असणार आहे. बारामती, जी फक्त पवारांच्या नावानं ओळखली जाते, तिथे पवारांच्याच घरातले या निवडणुकीत प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहेत.
या निवडणुकीवेळी वाढत्या उन्हामुळे बारामती विधानसभा मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. बारामती लोकसभेसाठी एकूण 59. 67 टक्के इतके मतदान झाले आहे. सुप्रिया सुळे यंदा ‘चौकार’ ठोकणार, की भाजपचे ‘मिशन बारामती’ यंदा यशस्वी होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.