Sunetra Pawar: बारामतीत नणंद विरुद्ध भावजय सामना रंगणार! अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर

Sunetra Pawar: अजित पवार गटाने अखेर सुनेत्रा पवार यांची बारामतीतून उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूक महाराष्ट्रातील सर्वात मोठा सामना असणार आहे.
Sunetra Pawar
Sunetra Pawaresakal
Updated on

Sunetra Pawar: बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. बारामतीत नणंद विरुद्ध भावजय असा सामना रंगणार आहे. सुनील तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली.

सुप्रीया सुळे बारामतीत विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रीया सुळे, अशी लढत होणार आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त ताईट फाईट या लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

यापूर्वी अजित पवार यांनी बारामतीत बोलताना मतदारांना भावनिक आवाहन केले होते. पुढील सार्वत्रिक निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या पण अनुभवी लोकांनी वेढलेला उमेदवार निवडून द्या. अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव न घेता आगामी निवडणुकीत पत्नी सुप्रिया सुळे यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे.

अजित पवार गटाने सुनेत्रा पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे. सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्या राज्यातील एका मोठ्या राजकीय घराण्यातील आहेत. त्यांचे भाऊ पदमसिंह पाटील हे माजी मंत्री आहेत, तर त्यांचे पुतणे राणा जगजितसिंह पदमसिंह पाटील हे भाजपचे आमदार आहेत.

सुनेत्रा पवार या आजवर सक्रिय राजकारणापासून दूर राहिल्या पण समाजसेवेच्या कार्यात त्या सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत. 2010 मध्ये स्थापन झालेल्या एनजीओ एन्व्हायर्नमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या त्या संस्थापक आहेत.

Sunetra Pawar
Sangli Lok Sabha 2024: ठाकरेंना झुगारुन सांगलीवर दावा ठोकणारे विशाल पाटील नेमके कोण आहेत?

बारामती मतदारसंघ हा परंपरागतपणे पवार घराण्याचा बालेकिल्ला आहे. शरद पवार यांनी 1967, 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये बारामती मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जिंकली आणि 1984, 1996, 1998, 1999 आणि 2004 मध्ये बारामतीतून लोकसभा निवडणूकही जिंकली. शरद पवार 2009 च्या लोकसभा निवडणुकीत माढा येथून विजयी झाले होते. तर सुप्रिया सुळे या 2009, 2014 आणि 2019 या तीन वेळा बारामतीच्या खासदार राहिल्या आहेत.

अजित पवार यांनी 1991 मध्ये बारामती लोकसभा निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी 1991, 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 अशी सात वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडल्यामुळे बारामतीत चुरशीचा सामना होणार आहे. 

Sunetra Pawar
NCP Candidates : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 5 उमेदवार जाहीर; निलेश लंके, सुप्रिया सुळेंसह 'या' नावावर शिक्कामोर्तब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.