गराडे - पुरंदर तालुक्यामध्ये दिवे व परिसरामध्ये आयटी पार्क उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर क्षेञ उपलब्ध आहे. याचा फायदा घेत. आज राज्यात ३५० कंपन्या या आयटी पार्कच्या जागेसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पुरंदरला भविष्यात आयटी पार्क होणे शक्य असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.
मी पुण्यात अनेक वर्ष राहिलो आहे. या मतदारसंघाचा विकास संसदरत्न पुरस्कार गोडाऊन मध्ये ठेवून होणार नाही. येथील जनता समजदार असून सुनेचा स्विकार करून मतदान करेल व मराठवाड्याच्या लेकीचे लाज राखेल यासाठी मी आलो असून मतांची भीक आपल्या समोर मागत आहे. असे मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.
काळेवाडी (ता. पुरंदर) येथील सरस्वती मंगल कार्यालय मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी महायुतीच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धनंजय मुंडे बोलत होते ते पुढे म्हणाले, मराठवाड्याच्या लेकीने १४ हजार महिलांना रोजगार दिला. सुप्रिया सुळेनी खासदारकीच्या काळामध्ये वडिलांची प्रतिष्ठा देशात असताना देखील 1 हजार लोकांना तरी रोजगार उपलब्ध करून दिले का?
देशाच्या विकासासाठी व प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यातून आलेल्या पवारांच्या सुनेला विजयी केले पाहिजे. यासाठी ही निवडणूक मराठवाड्याच्या प्रतिष्ठेची आहे. आपल्या घरामध्ये सून आली तरी आपण तिला लेकी सारखे मानतो.
बारामती लोकसभा मतदारसंघातील मतदार हे बदल घडवतील पुढचे २५ वर्षे महायुतीला आऊट करणे शक्य नाही. ही लढाई देशाच्या विकासासाठी आहे. बारामतीचा खासदार मोदींच्या पाठीमागे उभा राहणार असून अजित पवारांच्या विकासाच्या मागे उभे राहिले पाहिजे. अजितदादा हा दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणून ओळखला जातो.
यावेळी शिवसेनेचे नेते व मंत्री उदय सावंत, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे, प्रा. दिगंबर दुर्गाडे, बाबाराजे जाधवराव, जालिंदर कामठे, सुरज चव्हाण, दत्ता झुरंगे, वामन जगताप, नितीन कुंजीर, अमित झेंडे, विराज काकडे, निलेश जगताप उत्तम धुमाळ, दिलीप यादव, श्रीकांत ताम्हाणे, भूषण ताकवले, ईश्वर बागमार, कपिल भाडळे, रेवती कुंजीर, वंदना जगताप, अमृता घोणे, मयूर जगताप, सोमनाथ कणसे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.