Baramati : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम

Marriage: मराठा सेवा संघ जिजाऊ भवन यांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून सातत्याने काम सुरु आहे.
 : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम
Marraige in baramati sakal

Baramati: 15 लग्न जमणे ही आज एक समस्या होऊन बसली आहे. मनाजोगत स्थळ मिळण दिव्य झाले आहे. वधू आणि वर यांच्यामध्ये दुवा बनून लवकर लग्न जमण्यासाठी बारामती तालुका मराठा सेवा संघ जिजाऊ भवन यांच्या वतीने गेल्या सात वर्षांपासून सातत्याने काम सुरु आहे.

व्हॉटसअँप ग्रुपच्या माध्यमातून काल पाचशे लग्न जमण्याचा टप्पा पार झाला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूर्णपणे विनामूल्य सेवा देत पाचशे लग्न जमविण्याचे एक विधायक काम बारामती तालुका मराठा सेवा संघाच्या माध्यमातून प्रदीप शिंदे, जयकुमार मोरे, विजय तावरे, स्वाती ढवाण, सुनंदा जगताप, अनुराधा सपकळ, सुरेश कुटे यांच्या टीमने केले आहे. त्यांना संघाचे अध्यक्ष नामदेव तुपे, देवेंद्र शिर्के, दीपक बागल, पोपट वाबळे, प्रमोद शिंदे, मनोज पोतेकर, छाया कदम, जयश्री सातव यांनी सहकार्य केले आहे.

 : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम
Baramati: राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची निवड होताच बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष!

व्हॉटसअँप ग्रुपच्या माध्यमातून लग्न जमविण्यासाठी वधू वरांचे बायोडेटा सुरु करण्याचे काम बारामती तालुका मराठा सेवा संघाकडून सुरु झाले. बघता बघता त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला आणि राज्यभरातून त्यांच्याकडे लग्न जमविण्यासाठी मराठा समाजातील पालकांची मागणी येऊ लागली.

दैनंदिन कामकाज सांभाळून यातील प्रत्येक सदस्याने वधू वरांच्या पालकांना सविस्तर माहिती देण्याचे काम सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केले ही बाब येथे महत्वाची आहे. कोणत्याही लाभाची अपेक्षा न ठेवता हे काम निरपेक्षपणे केले गेले.

 : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम
Baramati Election Result: पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजितदादा काय म्हणाले?

काल या ग्रुपच्या माध्यमातून पाचशे लग्न जमण्याचा टप्पा या संस्थेने ओलांडला. आज त्यांच्याकडे 2500 बायोडेटा आहेत. लग्न जमल्यानंतर या संस्थेचा एकही सदस्य लग्नातील सत्कारालाही जात नाही, कोठेही याची जाहिरात किंवा प्रसिध्दीही केली जात नाही.

घटस्फोटित व विधवा महिला व पुरुषांचीही पुन्हा लग्ने व्हावीत या उद्देशाने त्यांचेही बायोडेटा गोळा केले जातात. लग्न जमविताना अनेकदा होणारी फसवणूक व इतर बाबी टाळण्याचाही यातून प्रयत्न केला गेला.

 : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम
Baramati : दादांच्या आमदारांनी दिल्या ताईंना शुभेच्छा? वाचा काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

ही एक चळवळ झाली....

बारामतीच्या या ग्रुपपासून प्रेरणा घेत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे व्हॉटसअँप ग्रुप तयार झाले आहेत. लग्न जमणे ही एक सामाजिक समस्या बनत चालली असून या निमित्ताने हे ग्रुप लोकांना मदत करत आहेत. – प्रदीप शिंदे, सदस्य, बारामती मराठा सेवा संघ, बारामती.

मुलींच्या अपेक्षा जास्त....

लग्न जमवताना अनेकदा मुलांचे शिक्षण कमी व मुलींचे शिक्षण जास्त असल्याचा अनुभव येतो. पुण्यात वास्तव्य, नोकरीच हवी यासह अनेक अपेक्षा मुलींना असल्याने लग्न जमताना अडचणी येतात असा अनुभव या वेळी सांगितला गेला.

 : मराठा सेवा संघाने जमविले 500 विवाह, सामाजिक बांधिलकीतून निरपेक्ष भावनेतून उपक्रम
Baramati Lok Sabha Result: अमेरिकेतही पवारांची चर्चा! ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकले शरद पवार-सुप्रिया सुळेचे फोटो; Video Viral

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com