बारामती : येथील बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक भारतीय जनता पक्ष व मित्रपक्ष पूर्ण ताकदीनिशी लढविणार आहेत. आज बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. भाजपचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके, प्रदेश सरचिटणीस बाळासाहेब गावडे, दिलीप खैरे, अँड. जी.बी.गावडे, युवराज तावरे, राजाभाऊ देवकाते, शशिकांत कोकरे प्रमोद खराडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी लढाई आहे. सोमवारी (ता. 3) भाजप व मित्र पक्षांचे उमेदवार आपले अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज घेतानाच माघारीचे फॉर्म, सुचकांच्या सहयासहित घेतले आहेत. ही हुकूमशाही असून बारामतीतील लोकशाही वाचवण्याच्या उद्देशानेच आम्ही ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे पांडुरंग कचरे यांनी सांगितले. भाजप आपल्या सोबत शिवसेना, रासप, रिपाई यांना घेऊन ही निवडणूक लढविणार आहे.
या निवडणुकीत मतदारांवर दबाव असून पैशांचा वापर देखील केला जाण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी एकाधिकारशाही वापरली जात असल्याचा आरोप रंजन तावरे यांनी केला. बारामतीत लोकशाही कायम राहावी व प्रत्येक मतदाराला मतदानाचा हक्क बजावता यावा, निवडणूक बिनविरोध होऊ नये, पुढाऱ्यांनी मतदारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले पाहिजे, असाच यामागचा उद्देश असल्याचे पांडुरंग कचरे यांनी सांगितले.
मतदारांना न्याय मिळावा व त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागू नये या उद्देशाने ही निवडणूक लढवत असल्याचे रंजन तावरे म्हणाले. शेतकरी विकास पॅनल या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व जागा भाजप लढविणार असल्याचे बाळासाहेब गावडे यांनी याप्रसंगी नमूद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.