Baramati : बारामती अजितदादांचीच ! बंडानंतर बारामती मधील पहिली निवडणुक केली बिनविरोध

बारामती दूध संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २ जून रोजी बिनविरोध पार पडली
Baramati milk union
Baramati milk union sakal
Updated on

माळेगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बंडाळी नंतर आज बारामती तालुक्यात बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची पहिलीच निवडणूक बिनविरोध पार पडली. या निवडणूक प्रक्रियेत अध्यक्षपदी पोपटराव सोमनाथ गावडे (रा. कऱ्हावागज) , उपाध्यक्षपदी संतोष मारुती शिंदे (रा. मुर्टी) यांचे बिनविरोध निवड झाली. संबंधित पदाधिकाऱ्यांना एक वर्षाचा कार्यकाळ ठरवून दिला आहे.

बारामती दूध संघाच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २ जून रोजी बिनविरोध पार पडली होती. त्या बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत दूध संघाचे सर्वेसर्वा व नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका अनेक वर्षांच्या परंपरेनुसार निर्णायक ठरली होती.

अर्थात त्याचपद्धतीने अजितदादांच्या सूचनेनुसार आज सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडकही बिनविरोध पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खंबायत यांच्या अधिपत्याखाली सोमवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी पोपटराव गावडे व उपाध्यक्ष पदासाठी संतोष शिंदे यांनी नावे जाहीर केली.

Baramati milk union
Baramati : हैप्पी स्ट्रीट्स उपक्रमाला उदंड प्रतिसाद, अजितदादांनी धनुष्य हातात घेऊन धरला नेम

त्यानुसार उपस्थित नवनिर्वाचित संचालक मंडळाने वरील पदाधिकाऱ्यांना बिनविरोध काम करण्याची संधी दिली. यावेळी संघाचे मुख्य व्यवस्थापक सचिन डोपे यांनी सदर बैठकीमधील मंजूर ठरावाचे प्रोसिडिंग पूर्णत्वाला आणले.

बारामती दूध संघाचा सर्वांगीन झालेला विस्तारवाढ विचारात घेता अजित पवार हे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कोणाची नावे सुचवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मावळते अध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक संदीप हनुमंतराव जगताप (कुरणेवाडी) यांनी वरील पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

Baramati milk union
Baramati News : आयर्नमॅनच्या ध्यासाने झपाटलेले बारामतीचे ननवरे कुटुंबिय

तसेच त्यांनी आपल्या कारर्किर्दीमध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ८० कोटी रुपये किंमतीचा दूध पावडर प्रकल्प नव्याने उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले. या प्रकल्प प्रस्तावाला सध्या महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळाली असून केंद्र सरकारच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पुढे गेला आहे.

याशिवाय कोविड काळात अधिकचे दूध संकलन, दूध विक्री आणि शेतकऱ्यांना अधिकचे दोनपैसे देण्यासाठी संचालक मंडळाची कामगिरी उल्लेखनिय ठरल्याचे जगताप यांनी सांगितले.

यावेळी नवनिर्वाचित संचालक संजय शेळके (काटेवाडी), प्रशांत खलाटे (लाटे), श्रीपती जाधव (डोर्लेवाडी), दत्तात्रेय वावगे (सोनवडी सुपे) , शहाजी गावडे (मळद), संजय कोकरे (पणदरे) , सतिश पिसाळ (फोंडवाडा),

Baramati milk union
Baramati Police: बारामती पोलिसांच्या तत्पपरतेबाबत प्रश्नचिन्ह; अशा घटनांचे पोलिसांना नाही गांभीर्य?

बापुराव गवळी (उंडवडी सुपे), नितीन जगताप (वाकी), किशोर फडतरे (सिद्धेश्वर निंबोडी), संजय देवकाते (नीरावागज), सुशांत जगताप, स्वाती खामगळ (ढाकाळे), शोभा जगताप (वडगाव निंबाळक) , राजेंद्र रायकर (काऱ्हाटी), पुरूषोत्तम गाढवे (आंबी खुर्द), मुख्य व्यवस्थापक सचिन ढोपे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.