बारामती : येथील नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण जाहीर झाले. आगामी पाच वर्षात नगरपालिकेत महिला सदस्यांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असेल. या सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करुन नगरसेवकपदासाठी फिल्डींग लावण्यास प्रारंभ केला आहे. या आरक्षणानंतर कही खुषी कही गम असे वातावरण तयार झाले आहे.
आज जाहीर झालेल्या 41 जागांपैकी तब्बल 21 जागांवर महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे पुरुषांना 20 जागा मिळणार आहेत. शासनाने धोरण बदलले असल्यामुळे नगरसेवकातून नगराध्यक्ष निवडला जाणार आहे, त्यामुळे नगरसेवकांच्या मताला अधिक किंमत प्राप्त होणार आहे. एक ते 19 या प्रभागात दोन नगरसेवक तर शेवटच्या विसाव्या प्रभागात तीन नगरसेवक निवडून येतील.
गेल्या अनेक दिवसांपासून अनेक इच्छुक या आरक्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. आज जाहीर झालेल्या आरक्षणा मध्ये 20 प्रभागातील 41 जागांसाठी आरक्षण घोषित करण्यात आले. प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे.
• प्रभाग 1 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग दोन सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 3 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 4 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 5 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 6 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 7 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 8 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 9 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
• प्रभाग 10 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
• प्रभाग 11 सर्वसाधारण (महिला) सर्वसाधारण
• प्रभाग 12 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 13 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण
*प्रभाग 14 अनुसूचित जाती व सर्वसाधारण(महिला)
• प्रभाग 15 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 16 अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिल
• प्रभाग 17 सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 18 अनुसूचित जाती व सर्वसाधारण (महिला)
• प्रभाग 19 अनुसूचित जाती (महिला) व सर्वसाधारण
• प्रभाग 20 अनुसूचित जाती, सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण (महिला)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.