Baramati Loksabha: सुनेत्रा पवार यांनी घेतली पृथ्वीराज जाचक यांची भेट..! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीला राजकीय महत्व

आता सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्याकडून भेटीगाठीचा सपाटा सुरु |Now Supriya Sule and Sunetra Pawar are going to meet
Baramati Loksabha: सुनेत्रा पवार यांनी घेतली पृथ्वीराज जाचक यांची भेट..! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीला राजकीय महत्व
Updated on

Baramati : येथील लोकसभेच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संभाव्य उमेदवार सुनेत्रा पवार यांनी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची त्यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (ता. 23) सदिच्छा भेट घेतली. जाचक कुटुंबिय व नटराजचे अध्यक्ष किरण गुजर हेही या प्रसंगी उपस्थित होते.

Baramati Loksabha: सुनेत्रा पवार यांनी घेतली पृथ्वीराज जाचक यांची भेट..! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीला राजकीय महत्व
Baramati News : बसस्थानक, पोलिस उपमुख्यालय व पोलिस निवासस्थानांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उदघाटन

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला वेगळे राजकीय महत्व आहे. काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी राहुल कुल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. काल त्यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेतली.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही काही दिवसांपूर्वी पृथ्वीराज जाचक यांच्याशी गोविंदबागेत चर्चा केली होती. राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर आता सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांच्याकडून भेटीगाठीचा सपाटा सुरु असून यात महत्वाच्या व्यक्तींसमवेत चर्चा हा महत्वाचा मुद्दा ठरत आहे.

Baramati Loksabha: सुनेत्रा पवार यांनी घेतली पृथ्वीराज जाचक यांची भेट..! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीला राजकीय महत्व
Baramati News : बारामतीत सुरु झाला लोकसभेचा प्रचार.....

पृथ्वीराज जाचक हे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच राज्य सहकारी साखर संघाचेही अध्यक्ष होते. त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात बारामती लोकसभेची निवडणूक लढविली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला होता. साखर व्यवसायातील एक अतिशय अभ्यासू नेतृत्व म्हणून जाचक यांच्याकडे पाहिले जाते.

ही सदिच्छा भेट होती असे सांगितले गेले असले तरी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून महत्वाच्या व्यक्तींचा पाठिंबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे दिसत आहे. दरम्यान पृथ्वीराज जाचक यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही.

Baramati Loksabha: सुनेत्रा पवार यांनी घेतली पृथ्वीराज जाचक यांची भेट..! लोकसभेच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीला राजकीय महत्व
Baramati News : बारामती पाटस मार्गावरील टोलआकारणीस प्रारंभ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.