Baramati : राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीला पंतप्रधान मोदी यांना बारामतीत आणणार;बावनकुळे

अभिजित देवकाते यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे sakal
Updated on

बारामती : पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या आगामी जयंतीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तर 300 व्या जयंतीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामतीत कार्यक्रमासाठी येण्याची विनंती भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने करु, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

येथील अभिजित देवकाते यांच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. या प्रसंगी राम शिंदे, राहुल कुल, विजय शिवतारे, चंद्रराव तावरे, राजेश पांडे, मुरलधीर मोहोळ, पांडुरंग कचरे, सतीश फाळके, अविनाश मोटे, दिलीप खैरे, बाळासाहेब गावडे, पृथ्वीराज जाचक, रंजन तावरे, मच्छिंद्र टिंगरे आदी उपस्थित होते.

बावनकुळे म्हणाले, जयंती साजरी करतानाच या पुढील काळात या परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळेल या दृष्टीकोनातून रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न अभिजित देवकाते यांच्यासारख्या युवकाने करावा, अशी सूचना त्यांनी केली. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जाज्वल्य इतिहास विसरु नका, त्यांनी केलेले काम आचरणात आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
Baramati News : आयर्नमॅनच्या ध्यासाने झपाटलेले बारामतीचे ननवरे कुटुंबिय

राम शिंदे यांनी भाषणात अहिल्यादेवी होळकर जयंतीच्या बारामतीच्या कार्यक्रमात आजपर्यंत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे का कधीच आले नाहीत, असा सवाल करत टीका केली. मावळ किंवा कर्जत जामखेडमध्ये कुटुंबातील सदस्यालाच का उमेदवारी दिली, इतर कोणीही नव्हते का, असे विचारत आगामी विधानसभेत मी राईट कार्यक्रम करतो, काळजीच करु नका असा इशारा त्यांनी रोहित पवार यांना दिला. सुप्रिया सुळेंनी पालखीत कधी भाकरी थापल्याचे ऐकिवात आहे का, पण आता परिस्थिती बदलली आहे याचेच हे निदर्शक आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
Baramati Politics : बारामतीतील राजकीय वातावरण तापणार

या प्रसंगी विजय शिवतारे म्हणाले बारामतीच्या निवडणूकीत धनगर समाजाचे निर्णायक मतदान आहे, त्या मुळे तुम्ही ठरवाल तोच आमदार खासदार होणार आहे, त्या दृष्टीने समाजबांधवांनी विचार करावा.

या प्रसंगी अभिजीत देवकाते यांनी प्रास्ताविकात स्वागत करुन पार्श्वभूमी विशद केली. मच्छिंद्र टिंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.