उंडवडी : उंडवडी सुपे ( ता. बारामती ) परिसरात आज दुपारी साडे तीनच्या ते चारच्या दरम्यान हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या भागातील शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र या भागातील पाणी टंचाई संपुष्टात येण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतिक्षा शेतकर्यांना करावी लागणार आहे.
उंडवडी सुपे परिसरातील सोनवडी सुपे, कारखेल, खराडेवाडी, जराडवाडी, अंजनगाव, जळगाव सुपे , उंडवडी कडेपठार आदी परिसरात आज ( ता. २४) रविवारी साडे तीन च्या दरम्यान आकाशात ढग दाटून आले. आणि अचानक पावसाला सुरवात झाली. या पावसानंतर शेतात पाणी साचले होते. तर काही ठिकाणी तालीत पाणी साचले होते. मात्र खराडेवाडी, जळगाव सुपे व अजंनगाव या तीन गावात अल्प पाऊस झाल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
पाऊस उघडल्यानंतर अनेकजण घराबाहेर पडून पडलेल्या पावसाची पाहणी करत होते. या पावसामुळे ऊस आणि मका या पिकाच्या किमान दोन पाळ्या वाचतील, असे उंडवडी सुपे येथील शेतकरी सतिश गवळी यांनी सांगितले. या पावसामुळे शेतकर्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र या भागातील पाणी टंचाई संपुष्टात येण्यासाठी आणखी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
शेतकरी रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी करण्यासाठी अतुरतेने पावसाची वाट पाहत होते. अखेर पावसाने सुरवात केल्याने गणपती बप्पा पावले. अशी भावना शेतकर्यांनी बोलून दाखवली. या पावसानंतर वाफसा आलेल्या शेतात रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी शेतकरी करतील. तसेच जनावरांसाठी मका , कडवळ , घास अशी चारा पिके घेतील. या पावसानंतर शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.