Pune : बारामतीकरांचा रोटरी फन झोनला उत्स्फूर्त प्रतिसाद

या फन झोनमध्ये विद्यार्थ्यांसोबतच युवक व आबालवृध्दांनीही फन झोनमधील विविध खेळांचा आनंद लुटला.
baramati
baramatisakal
Updated on

बारामती - येथील रोटरी क्लब व रोट्रॅक्ट क्बलच्या वतीने आयोजित रोटरी फन झोनमध्ये रविवारी (ता. 16) बारामतीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. या फन झोनमध्ये विद्यार्थ्यांसोबतच युवक व आबालवृध्दांनीही फन झोनमधील विविध खेळांचा आनंद लुटला.

पहाटेपासूनच या फन झोनमधील खेळांसह झुंबा व इतर नृत्याचा लोकांनी आनंद घेतला. या फन झोनमध्ये सहभागी व्यक्ती व संस्थांचा मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

या फन झोनमध्ये राहील झारी आणि अन्सार इनामदार- बासरी व सेक्सोफोन सादरीकरण, विनय बनकर- झुंबा व योगा, रितेश देशमुख- आर्चरी, युनुस इनामदार-नृत्य, आकाश कुंभार- मातीकाम, फाल्गुनी देशपांडे, रंजना तांबे, रुपाली तावरे व महेंद्र दीक्षित- रंगकाम, वरद देशपांडे, माहेश्वरी दीक्षित, संग्राम जगताप, पवन देशपांडे यांनी कागदाच्या विविध गोष्टी बनवून दाखविल्या.

baramati
Nail Art ची पडतेय तरुण-तरुणींना भुरळ

दादा आव्हाड यांनी कबड्डी तर निशांत बनकर यांनी मल्लखांब प्रात्यक्षिक सादर केले. डॉ. चंद्रकांत कांबळे व डॉ. आबा कर्डीले यांच्या मार्गदर्शनाखाली टीसी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्य सादर केले.

एकता शहा- स्केटींग, दीपक मोरे- कराटे, इस्कॉन- भजन, सलीम बागवान यांनी विनोदाचे सादरीकरण केले.

baramati
ZP Super 50 Activity: 'सुपर 50' साठी 4263 विद्यार्थ्यांची हजेरी! जिल्ह्यातील 16 केंद्रावर पार पडली परीक्षा

रोटरी फन झोन यशस्वी होण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्ष दर्शना गुजर, सचिव अभिजित बर्गे, सचिन चवरे, मल्लिकार्जुन हिरेमठ, रोट्रॅक्ट क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष आशिष अबड, सचिव यश जाधव यांनी परिश्रम केले. प्रास्ताविक दर्शना गुजर यांनी केले, डॉ अजय दरेकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.