पतीला वाचवण्यासाठी लता करे मॅरेथाॅन धावल्या पण, कोरोनाने घात केला

अनवाणी पायाने पतीवरील उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये धावून पैसे गोळा करणाऱ्या लता करे यांच्या पतीचे निधन.
latakare
latakareSakal Media
Updated on

बारामती : ज्याचा जीव वाचविण्यासाठी जिवाचे रान केले, अनवाणी पायाने नऊवारी लुगडे नेसून मॅरेथॉनमध्ये सहभागी होत पारितोषिक पटकावले, त्या जिवानेच अखेरचा श्वास घेतला अन् एका जिद्दी माऊलीची धावच थंडावली. अनवाणी पायाने पतीवरील उपचारासाठी मॅरेथॉनमध्ये धावून पैसे गोळा करणा-या आणि त्यांच्यावरील चित्रपटात स्वत: भूमिका साकारणाऱ्या लता करे (lata kare) यांचे पती भगवान करे (bhagwan kare) यांचे मंगळवारी (ता. 4) कोरोनाने (Corona) निधन झाले. (baramati senior athlete lata kare husband bhagwan kare died due to Corona).

latakare
एप्रिलमध्ये पुणे रेल्वेला कोट्यावधींचा नफा

आपल्या अचाट जिद्दीच्या जोरावर कसलाही पाठिंबा नसताना वयाच्या 67 व्या वर्षी लता करे यांनी केवळ उपचारासाठी बक्षीसाची रक्कम कामाला येईल या उद्देशाने बारामतीत झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग काय घेतला. त्यांना प्रथम क्रमांक काय मिळाला आणि त्या एका रात्रीत प्रसिध्दी काय पावल्या. सगळेच एखाद्या चित्रपटात शोभावे असेच झाले. कडाक्याच्या थंडीत धावल्या आणि पुढे सलग तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेत त्यांनी ज्येष्ठांच्या श्रेणीत विजेतेपदाची हॅटट्रीक साधली. हा प्रवास इथवरच थांबला नाही तर या जिद्दी माऊलीवर ए चित्रपट करायचे दक्षिणात्य निर्माते ए कृष्णा अरुबोधु यांनी निश्चित करुन चित्रपटाची निर्मिती केली, नविन देशबोईना यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. यातही विशेष म्हणजे लता करे यांची भूमिका स्वताः लता करे यांनीच साकारलेल्या या मराठी चित्रपटास राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विशेष पुरस्कार मिळाला.

latakare
पिंपरी शहरातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या संतप्त भावना

गेल्या सात आठ वर्षात लता करे अनेक मॅरेथॉनमध्ये धावल्या व त्यांनी बक्षीसेही मिळवली पण कोरोनाच्या संकटातून पतीला बाहेर काढण्यात मात्र लता करे यांना अपयश आले. ज्या पतीसाठी इतकी वर्षे मेहनत केली त्या पतीचेच निधन झाल्याने लता करे व कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला. बारामतीत उपचार सुरु असताना भगवान करे यांचे निधन झाले. लता करे यांना औषधोपचारासाठी राष्ट्रवादीच्या शहर महिलाध्यक्षा अनिता गायकवाड यांनी मदतीचा हात देऊ केला होता, मात्र कोरोनाने या सर्वांच्या प्रयत्नांवर मात करत भगवान करे यांना हिरावून नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.