माळेगाव - बऱ्हापुर (ता.बारामती) गावातील सार्वजनिक रस्त्यावरील वाढते अतिक्रमण हटविण्यासाठी येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने बीएसएनएल कंपनीच्या मोबाईल टाॅवरवर चढून `शोले` स्टाईल आंदोलन आज सकाळी ८ वाजल्यापासून सुरू केले. अनिल भानुदास गवळी (वय ४५,रा. बऱ्हापूर) हे आंदोलनकर्त्याचे नाव असून प्रशासनाचे वरील मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी गावातील बीएसएनएलच्या टाॅवरवर चढून आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. ही बातमी तालुक्यात वाऱ्यासारखी पसरल्याने सर्वप्रथम पोलिस प्रशासनाने कायदा सुवेवस्था अबाधित राहण्यासाठी घटनास्थळी धाव घेतल्याचे सांगण्यात आले. विशेषतः बऱ्हांपूर गावातील सार्वजनिक रस्त्यावर काही लोकांनी अतिक्रमण केल्याने गावकऱ्यांची जे-जा करताना मोठी गैरसोय होत आहे.
याबाबत जिल्हा परिषद, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत प्रसासनाकडे वारंवार अतिक्रमण काढण्याबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु संबंधित प्रशासनाने या सार्वजनिक कामात लक्ष न घातल्याने नाइलाजास्तव जीव धोक्यात घावून आंदोलन करण्याची वेळ माझ्यावर आली आहे, अशी भूमिका आंदोलनकर्ते गवळी बोलून दाखवित आहेत. दुसरीकडे, बऱ्हापुर येथील आंदोलनकर्ते गवळी यांनी याआगोदर प्रशासनाकडे केलेल्या लेखी मागण्या पुढील प्रमाणे ः सर्वजनिक रस्तासह गावठाण जागेतील अतिक्रमण हाटवावे, ग्रामपंचायतीमधी भ्रष्ठ प्रकरणाची चौकशी व्हावी, घरकुल योजनेत शासनाची फसवणूक करणे, दाखल झालेल्या खोट्या गुन्ह्यांची चौकशी होणे, गावात झालेल्या शासकिय कामांचे माहिती फलक लावणे, बऱ्हांपुर गाव (गावठाण) हद्द कायम करणे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दिला उपोषणाचा इशारा,पण चढले टाॅवरवर...!
आंदोलनकर्ते अनिल गवळी यांनी अतिक्रमाणासह विविध मागण्यांसाठी उपोषणाचा इशारा प्रशासनाला दिला होता. अर्थात मिळालेल्या पत्राच्या आधारे गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी २१ आॅक्टोंबर रोजी तक्रारकर्ते, प्रशासक सुनिल गायकवाड, ग्रामसेवक नवनाथ बंडगर, संबंधित घटकांची सुनावणी घेतली होती. रस्त्यावरील अतिक्रण काढण्यासाठी पुढील काही दिवसांचा कालावधी संबंधितांना दिला होता. परंतु या प्रक्रियेला अंतिम स्वरूप येण्याआगोदरच गवळींनी उपोषणाच्या ऐवजी टाॅवरवर चढून आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.