बारामती : शहरातील रेमडेसेविर इंजेक्शनच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी आज चार सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत याबाबत नगरसेवक किरण गुजर यांनी एक प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्विकारत याबाबत समिती नियुक्त करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या. दुसरीकडे शहरातील दोनशेहून अधिक डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करण्यासही आज मान्यता देण्यात आली.
तळेगाव : पोलीस आयुक्तांकडून मध्यरात्री सायकलवरुन लॉकडाउनचा आढावा
सदानंद काळे, मनोज खोमणे, राहुल मस्तुद ही डॉक्टर मंडळी आणि अन्न व औषध विभागाचे निरिक्षक विजय नगरे यांचा या समितीत समावेश आहे. या समितीनं घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या रुग्णालयात जितके रुग्ण दाखल असतील व ज्यांना इंजेक्शनची आवश्यकता असेल, त्या रुग्णालयातील औषध दुकानांना त्या प्रमाणात इंजेक्शनचा पुरवठा करण्यात येणार आहे. रुग्णाला रेमडेसेविरची आवश्यकता खरोखरच आहे की नाही हे देखील ही समिती तपासून बघेल आणि त्यानुसारच या इंजेक्शनचा पुरवठा केला जाणार आहे. आज झालेल्या बैठकीत बारामतीतील एका डॉक्टरने एका रुग्णाला आठ इंजेक्शनचे प्रिस्क्रीप्शन देण्याचा प्रकार समोर आला.
दरम्यान, शहरातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आता डॉक्टरांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे शहरातील दोनशेहून अधिक वैद्यकीय व्यावसायिकांची सेवा मानधन तत्वावर अधिग्रहीत करण्याच्या प्रस्तावासही आज मान्यता देण्यात आली. लवकरच याबाबतचा प्रस्ताव तयार करुन या डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत केली जाणार असल्याचेही किरण गुजर यांनी सांगितले. व्हेंटिलेटर्स, ऑक्सिजनसह कोविड केअर सेंटर व इतर आवश्यकता असेल तिथे या डॉक्टरांना सेवा द्यावी लागणार आहेत. डॉक्टर नसल्याने उपचार होऊ शकले नाहीत, असे घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक
बारामतीतील एका एमबीए महाविद्यालयाचे तसेच विद्या प्रतिष्ठान संस्थेचे प्रत्येकी १३० खाटांच्या क्षमतेचे वसतिगृह देखील कोविड केअर सेंटर म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. लवकरच तेथेही रुग्णांची व्यवस्था होणार आहे. सध्या बारामतीतील विविध कोविड केअर सेंटरमध्ये ७३५ क्षमता असून सध्या तेथे जवळपास ७०० रुग्ण आहेत. रयत भवन येथेही कोविड केअर सेंटरचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
अशा पद्धतीनं चालणार समितीचं कामकाज
दैनंदिन मुख्य वितरकांना आलेल्या स्टॉकची नोंदणी करणे
मुख्य वितरकांकडून उपवितरक, रुग्णालयांना स्टॉक वितरीत होणार
रुग्णालयातील डॉक्टरांनी नमुना फॉर्म भरुन समितीला पाठवणार
डॉक्टरांच्या मेलनुसार समिती निर्णय घेणार, मान्यता देणार
मान्यता दिलेल्या रुग्णास इंजेक्शन, दवाखाना स्टोअरमधून स्टॉक खर्ची टाकणे
इंजेक्शन कमी जास्त असेल तेथे वापराचे नियोजन समिती करेल
तातडीच्या वेळेस डॉक्टरांना इंजेक्शन द्यावे लागल्यास त्याला कार्योत्तर मंजूरी देणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.