बारामती : मृत्यूच्या दारातून उमेशला परत आणण्यात यश

ट्रॅक्टरच्या मोठ्य चाकाखाली गेल्याने त्याच्या शरीरावर या चाकाचा दाब पडल्याने तो बेशुध्द झाला
ट्रॅक्टर
ट्रॅक्टरsakal
Updated on

बारामती : एखाद्याच्या नशीबाची दोरी बळकट असेल तर त्याच्यावर आलेले संकटही दूर होते, याचा प्रत्यय उमेश (ता. इंदापूर) यांना नुकताच आला. उस वाहतूकीच्या ट्रॅक्टरवर चालक म्हणून सेवेत असलेल्या उमेश यांचा 28 मार्च रोजी घरी परतत असताना अपघात झाला. गतीरोधकावरुन ट्रॅक्टर उडाल्याने स्टिअरिंग लॉक झाल्याने ट्रॅक्टर चारीत पडला, जीव वाचविण्यासाठी उडी मारल्याने उमेशचा शर्ट ट्रॅक्टरच्या मडगार्डमध्ये अडकल्याने तो ट्रॅक्टरच्या मोठ्य चाकाखाली गेल्याने त्याच्या शरीरावर या चाकाचा दाब पडल्याने तो बेशुध्द झाला.

त्याला चाकाखालून काढून तातडीने बारामतीच्या देवकाते हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. त्याचा रक्तदाब कमी असल्याने व स्थिती नाजूक असल्याने त्याला बारामती हॉस्पिटलमध्ये नेले गेले. तेथे अतिदक्षता विभागात त्याची स्थिती स्थिर झाली. मात्र परिस्थिती नसल्याने पुन्हा त्यास देवकाते हॉस्पिटलला दाखल केले गेले.

प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अखेर सर्जन डॉ. महादेव स्वामी यांनी त्याचा सिटी स्कॅन करुन शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. स्वामी यांच्यासह डॉ. ऋषीकेश स्वामी, भूलतज्ज्ञ डॉ. संतोष घालमे यांनी तीन तास त्याच्यावर शस्त्रक्रीया केली. 70 च्या खाली येत असलेली ऑक्सिजनची पातळी विचारात घेता भूल देणेही धोकादायक होते, मात्र डॉ. संतोष घालमे यांनी जोखीम पत्करुन भूल दिली.पोट उघडल्यानंतर डॉ. स्वामी यांच्या लक्षात आले की रुग्णाचे जठर, मोठ्या आतड्याचा डावा भाग, लहान आतडे श्वास पटलास छिद्र पाडून डाव्या छातीत घुसले आहे. फुफ्फुसास कामकाजास या मुळे अडथळा निर्माण झाला आहे.स्वामी यांनी श्वासपटलाच्या छिद्रामध्ये हात घालून छातीत गेलेले जठर, मोठे आतडे, लहान आतडे खाली पोटात ओढून घेतले.

फुटलेल्या रक्तवाहिन्या बंद करुन रक्तस्त्राव थांबविला गेला, श्वासपटलाचे छिद्र बुजविले गेले, त्या नंतर रुग्णाची ऑक्सिजनची पातळी सुधारली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती आता झपाट्याने सुधारत आहे. डॉ. स्वामी पितापुत्रांनी धाडसाने केलेल्या शस्त्रक्रियेमुळे उमेशला जीवदान मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.