Baramati News : प्रभात ते सैराट... बारामतीकरांनी अनुभवली सूरमयी संध्याकाळ

तनिष्कच्या बारामती शोरुमच्या वतीने बारामतीकरांसाठी दिवाळीचे औचित्य साधून प्रभात ते सैराट हा राहुल सोलापूरकर यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला.
Baramati News : प्रभात ते सैराट... बारामतीकरांनी अनुभवली सूरमयी संध्याकाळ
Updated on

बारामती - अयोध्येचा राजा ते सामना... अशी ही बनवाबनवी ते जोगवा आणि नटरंगपासून ते सैराट या चित्रपटापर्यंत जुन्या नवीन चित्रपटांच्या चित्रप्रवास व गीत गायनाचा बारामतीकरांनी गुरुवारी (ता. 2) सुखद अनुभव घेतला.

तनिष्कच्या बारामती शोरुमच्या वतीने बारामतीकरांसाठी दिवाळीचे औचित्य साधून प्रभात ते सैराट हा राहुल सोलापूरकर यांचा संगीतमय कार्यक्रम आयोजित केला गेला.

राहुल सोलापूरकर यांनी मराठी चित्रपटांची सुरवातीपासूनची वाटचाल रंजक पध्दतीने वैविध्यपूर्ण माहिती देत रसिकांपुढे सादर केली. संत तुकाराम, कुंकू, माणूस या चित्रपटातील गीतांचे सादरीकरण प्रभात कंपनीची वाटचाल उलगडली.

Baramati News : प्रभात ते सैराट... बारामतीकरांनी अनुभवली सूरमयी संध्याकाळ
Maratha Reservation : अखेर डॉ. उद्धवराजे काळे यांचे अन्नत्याग उपोषण मागे

कौटुंबिक चित्रपटानंतर तमाशाप्रधान चित्रपटांची आलेली लाट, त्या नंतर धुमधडाका, थरथराट, अशी ही बनवाबनवी अशा अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, महेश कोठारे यांचे करमणूकप्रधान चित्रपट, त्या नंतर अग बाई अरेच्चा, जोगवा, नटरंग, बालगंधर्व, कटयार काळजात घुसली अशा अलिकडील काळातील विविध विषय घेत साकारलेले चित्रपट, त्यातील नृत्य, गीते व संवाद यांच्या सुंदर सादरीकरणाने बारामतीकर भारावून गेले.

मिलिंद ओक यांची निर्मिती, राहुल सोलापूरकर, जितेंद्र अभ्यंकर, चैतन्य कुलकर्णी, मृण्मयी तिरोडकर, योगिता दामले, मोहिका दामले यांच्या सह अनेक कलाकारांनी आपली कलासादर केली. उत्तम दिग्दर्शन, कलात्मक नेपथ्य, सुंदर वेशभूषा यांचा सुंदर मिलाफ या कार्यक्रमाच्या निमित्ताने बारामतीकरांना अनुभवता आला.

तनिष्क बारामतीचे चेतन शहा (वाल्हेकर), सारिका शहा, अपर्णा शहा, कुसुम शहा, निमिष व मानस शहा यांनी स्वागत केले. पौर्णिमा तावरे, मधुबाला भोसले, अँड. ए.व्ही. प्रभुणे, किरण गुजर, किशोर शहा (सराफ), मनोज पोतेकर, धनंजय जामदार, किशोर मेहता यांनी दीपप्रज्वलन करुन प्रारंभ केला. मिलिंद वाघोलीकर यांनी आभार मानले.

या प्रसंगी तनिष्कचे एरिया बिझनेस मॅनेजर चंदन गुप्ता यांनी तनिष्क व टाटा ब्रँडबाबत माहिती दिली. ज्वेलरी डिझाईनर आयनतिना यांनी तनिष्कच्या धरोवर या नवीन कलेक्शनबाबत माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.