Baramati : घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात बारामतीत रणशिंग फुंकणार : निर्मला सीतारामन

बारामतीतील लोकसभेमध्ये घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात रणसिंग फुंकण्याची घोषणा ; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
Baramati
Baramati sakal
Updated on

बारामती : लोकसभेच्या आगामी निवडणुकीमध्ये परिवर्तनासाठी बारामतीतील घराणेशाही व भ्रष्टाचाराच्या विरोधात रणसिंग फुंकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली.बारामती शहरातील भारतीय जनता पक्षाच्या संपर्क कार्यालयाला भेट दिल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी घराणेशाही व भ्रष्टाचार या विरोधात काम करण्यासाठी बारामतीत भरपूर संधी असून, भाजपच्या कार्यकर्त्यांनी यापुढील काळात मतदारांपर्यंत पोहोचत केंद्राच्या सर्व योजना मतदारांना समजून सांगाव्यात असे आवाहन केले.

एकाच मतदारसंघात होणारी प्रगती दूर करून सर्व मतदारसंघात समान विकास साध्य केला पाहिजे, याचाही आवर्जून उल्लेख त्यांनी केला.बारामतीतील भाजप कार्यालयामध्ये तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, शहराध्यक्ष सतीश फाळके तसेच जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी निर्मला सीतारामन यांचे स्वागत केले. त्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी आपला आवाज हा लोकांपर्यंत पोहोचत असून आपली भाषा देखील केवळ कार्यकर्तेच नाहीत तर या ठिकाणी उपस्थित नागरिकांनाही समजत असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी त्यांची भाषा बारामतीकराना जरूर समजेल असा खोचक उल्लेख केला होता, तो धागा पकडून निर्मला सीतारामन यांनी आज थेट शरद पवार यांना हा संदेश दिलागरिबी हटावचा नारा घेऊन काँग्रेसने 20 कलमी कार्यक्रम आखला, मात्र रायबरेली किंवा अमेठी मध्ये देखील विकासाचे काम होऊ शकलं नाही. भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेश मध्ये सर्व मतदारसंघात समान विकासाचे सूत्र नजरेसमोर ठेवून सबका विकास हेच ध्येय कायम करीत काम सुरू केल्याचा उल्लेख त्यांनी केला.

बारामती मध्ये येऊन भाजपचे संघटन मजबूत करणारे आणि हे नाते केवळ निवडणुकीपुरते नसून कायमस्वरूपी बारामतीकरांशी आपले नाते कायम राहील याचा उल्लेख करण्यास देखील निर्मला सीतारामन विसरल्या नाहीत.चुनाव का रिश्ता नही है… अशा शब्दात त्यांनी हे ऋणानुबंध कायम राहतील असे अधोरेखित केले.

त्या म्हणाल्या, भाजपचे संघटन मजबूत करण्याचा एक भाग म्हणून माझा बारामती दौरा होता, मात्र माझ्या बारामतीच्या दौऱ्यामुळे वातावरण गरम होत असल्याचे आपल्या निदर्शनाला आले. वास्तविक जे चांगले काम करत आहात ते करत रहा पण बारामतीत माझ्या दौऱ्याची एवढी गरमागरम चर्चा का… असा मिश्किल उल्लेख आहे त्यांनी केला.या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे, मात्र एका मतदारसंघाचा अपवाद सोडल्यास इतर मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

घराणेशाहीतून भाई भतीजावाद व त्यातून भ्रष्टाचाराला प्रोत्साहन मिळत आहे व बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यासाठी शंभर पैकी शंभर गुण द्यावे लागतील अशी थेट टीका निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केली.भाजपचे चारित्र्य मात्र सर्वांचा समान विकास व्हायला पाहिजे असाच आहे. मतदारसंघातील ठराविक वर्गाला विकासाच्या दृष्टिकोनापासून वंचित ठेवण्याचा हा प्रयत्न म्हणजे वंशवादाला खतपाणी घालण्यासारखाच आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

पवारांना दिला असाही संदेश

निर्मला सीतारामन बारामतीकरांशी संवाद साधण्यात यशस्वी ठरल्या आहेत, हे दाखविण्यासाठी त्यांनी उपस्थितांना तुम्हाला मी जे बोलते आहे ते समजते का असे जाहीरपणेच विचारले…. लोकांनी होय.. असे सांगितल्यानंतर तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे असे सांगत दोन्ही हात उंचावून तुम्हाला समजत असेल तर सांगा…. असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर दोन्ही हात वर करून तुमची भाषा समजत असल्याचे लोकांनी सांगितले. आपले विचार लोकांपर्यंत पोहोचत आहेत हाच संदेश या निमित्ताने निर्मला सीतारामन यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचविला असल्याची या निमित्ताने चर्चा होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.