बारामती : बारामतीत हाय व्होल्टेज लढत नव्हतीच, हेच बारामतीच्या मतदारांनी दाखवून दिले. ‘लोकसभेला ताई व विधानसभेला दादा’ हाच ट्रेंड बारामतीत चालला. बारामतीच्या विकासासाठी अजित पवार हेच हवेत, हे मतदारांनी दाखवून दिले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आवाहन केले तरी विधानसभेला मात्र मतदारांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि अजित पवार हेच विकासासाठी आमदार म्हणून हवे आहेत, हे मतपेटीतून दाखवून दिले.