Baramati Crime : एकाच रात्रीत 16 सदनिका फोडल्याने बारामतीकर चिंताग्रस्त...

शहरातील तब्बल 16 सदनिका अवघ्या दोन तासांच्या आत फोडून चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेसह नागरिकांच्या सुरक्षितेताबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले
Baramati Crime
Baramati Crimesakal
Updated on

बारामती : शहरातील तब्बल 16 सदनिका अवघ्या दोन तासांच्या आत फोडून चोरट्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेसह नागरिकांच्या सुरक्षितेताबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. चार चाकीमध्ये येत कटावणीच्या सहाय्याने विविध अपार्टमेंटमधील बंद सदनिका चोरटे निवडतात व त्यातील जवळपास 22 तोळे सोने व इतर ऐवज लांबवितात ही घटना पोलिसांनाही विचार करायला लावणारी असल्याचे नागरिकांचे मत आहे.

दिवसा होणारी लूटमारी, रात्रीची घरफोडी या प्रकाराने नागरिकात घबराटीचे वातावरण आहे. अनेक अपार्टमेंटमध्ये सुरक्षिततेसाठी अधिक उपाययोजना करण्याकडे आजपासून सर्वांनीच पुन्हा एकदा लक्ष देण्यास आजच्या घटनेने प्रारंभ केला आहे.

दिवसा व रात्रीची गस्त, अनोळखी दुचाकी व चारचाकी थांबवून तपासणी, नाकाबंदी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती, अचानक तपासणी मोहिम राबविणे, नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी थांबवून चौकशी करणे असे उपाय करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रभागनिहाय वेषातील पोलिसांची दिवसा गस्त सुरु करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.

बारामतीतील सीसीटीव्ही प्रकल्प रेंगाळला असल्याने त्याचा फटका बारामतीकरांना बसत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास अनेक गुन्हे रोखण्यास मदत होऊ शकेल. दुसरीकडे नगरपालिकेला वारंवार विनंती करुनही पथदिवे पहाटे पाचच्या सुमारास बंद केले जातात, रात्र मोठी होऊ लागल्याने पथदिव्यांचा कालावधी वाढविण्याबाबत विनंती करुनही नगरपालिकेकडून या कडे दुर्लक्ष केले जाते. अंधाराचा फायदा चोरटे उठवू शकतात ही बाब माहिती असतानाही या बाबत काही केले जात नाही.

नागरिकांचाही सहभाग अपेक्षित....

बारामती परिसरात संशयित इसम दिसल्यास किंवा काही संशयास्पद हालचाली किंवा वाहन दिसल्यास जागरुक नागरिकांना ताबडतोब पोलिसांना याची माहिती दिल्यास पोलिसांनाही त्याची मदत होऊ शकते, त्या दृष्टीने नागरिकांनीही पोलिसांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()