Barti Pune Scholarship Mahajyoti Sarthi Yojana
पुणे : बार्टीतील पीएचडीच्या संशोधक विद्यार्थ्यांना राज्य सरकारने १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय जाहीर केल्याने तेथील विद्यार्थी खुश झाले आहेत. मात्र, सारथी आणि महाज्योतीमधील विद्यार्थी संतप्त झाले आहेत. शैक्षणिक पात्रता, गुणवत्ता आणि प्रक्रिया तिन्ही संस्थांत सारखीच असताना तेथे समान धोरणाची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
सारथी आणि महाज्योतीमधील विद्यार्थ्यांनाही १०० टक्केच शिष्यवृत्ती मिळायला हवी. दरम्यान, राज्य सरकारच्या भेदभावाच्या धोरणाच्या निषेधार्थ सारथीमधील विद्यार्थ्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.