Baya Karve Award : आदिवासी भागात पायपीट करत महिलांचा विकास

बुथरी तातींनी उलगडला कार्याचा प्रवास : बाया कर्वे पुरस्काराचे वितरण
Baya Karve Award
Baya Karve Award
Updated on

पुणे : ‘वयाच्या १५ व्या वर्षीच आपल्या समाजासाठी जीवन समर्पित करण्याची शपथ घेतली. यासाठी राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बस्तर, दंतेवाडा या नक्षलग्रस्त भागातील आदिवासी क्षेत्रात काम सुरू केले. यानुसार या परिसरातील ४०० गावांत अविरत पायपीट केली.

या वेळी स्थानिकांचा विश्वास जिंकण्याचे आव्हान होते. ते पेलण्यात यश आले. यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षणाची व्यवस्था करता आली.

घराघरांमधून आरोग्याचे धडे देतानाची मेहनत, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींची भीषणता अशा अनुभवांच्या माध्यमातून छत्तीसगडमधील दंतेवाडा येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बुधरी ताती यांनी त्यांच्या सामाजिक कार्याचा प्रवास उलगडला.

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील यंदाचा ‘बाया कर्वे पुरस्कार’ हा छत्तीसगडमघील नक्षलग्रस्त भागात महिला सशक्तीकरणाचे कार्य करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ताती यांना मंगळवारी (ता. २९) प्रदान करण्यात आला. या पुरस्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या.

या परिसरातील नागरिकांचा विश्‍वास संपादन केल्यानंतर, आम्ही म्हणजे मदत करणारे लोक, आपलेच लोक अशी त्यांची भावना झाली आणि या भावनेतून तेथील नक्षलवादी कारवाया करणाऱ्यांनीसुद्धा आम्हाला भेटताना शस्त्र खाली टाकून आमच्या सामाजिक कार्याला सकारात्मक प्रतिसाद दिला, असेही त्या पुढे म्हणाल्या.

या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, कर्वे संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपाध्यक्षा स्मिता कुलकर्णी, कार्याध्यक्ष रवींद्र देव, राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय संपर्कप्रमुख पोर्णिमा शर्मा, संस्थेचे सचिव डॉ. पी.व्ही. एस. शास्त्री, बुधरी ताती यांच्या सहकारी शांतीदीदी आदी उपस्थित होते.

बुधरी ताती आणि त्यांच्या उपस्थित सहकारी शांतीदीदी यांच्या क्षेत्रात मला प्रत्यक्ष जाण्याचा योग आला आणि या भगिनींजवळ असलेले ज्ञान पाहून मला थक्क व्हायला झाले, अशा भावना गिरीश प्रभुणे यांनी या वेळी व्यक्त केल्या. शिक्षिका सुवर्णा तांबे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.