ब्युटी पार्लर, सलूनची दारे उघडली; नागरिकांची मोठी गर्दी

अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात तब्बल दोन महिन्यानंतर शहरातील ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
Saloon
SaloonSakal
Updated on

पुणे - अनलॉकच्या (unlock) पहिल्या टप्प्यात तब्बल दोन महिन्यानंतर शहरातील ब्युटी पार्लर (Beauty Parlour) आणि सलून (Saloon) उघडण्यास परवानगी (Open Permission) देण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांनी अगदी सोमवारी देखील पार्लर व सलूनला भेट दिली. सर्व खबरदारी घेत नागरिकांना हेअर कट, हेअर सेटिंग, दाढी आदींची सेवा पुरविण्यात आली. (Beauty Parlour and Sloon Open in Pune)

लग्नाच्या तारखा कमी असल्याने सध्या अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नाही, असे काही पार्लर चालकांनी सांगितले. तर काही ठिकाणी केवळ हेअर कट व इतर गोष्टींसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शहरात काही पार्लर व सलूनमध्ये वीकेंडला नागरिकांची होणारी गर्दी चक्क सोमवारी पाहायला मिळाली. तर नागरिकांनी अशाच प्रकारे प्रतिसाद द्यावा, अशी आशाही पार्लर व सलून चालकांनी व्यक्त केली आहे.

Saloon
पुणे : 'आरटीओ'चे कामकाज होणार मंगळवारपासून सुरू

पार्लरचालक वृषाली शेडगे म्हणाल्या, ‘पार्लरमध्ये महिलांचा प्रतिसाद पूर्वीच्या तुलनेत कमीच होता. पावसाळ्यात नेहमी ग्राहकांची संख्या कमी होते. त्यात दोन महिने पार्लर बंद असल्यामुळे उत्पन्न झाले नवते. मात्र, आता परवानगी मिळाल्यामुळे काही प्रमाणात असो पण ग्राहक येतील. तसेच पार्लरमध्येही सर्व काळजी घेण्यात येत आहे.’

परवानगी मिळाल्यामुळे आम्ही आनंदात आहोत. सध्या म्हणावा तसा प्रतिसाद नाही. परंतु काही प्रमाणात उत्पन्न सुरू झाले आहे. नागरिकांना सुरक्षित सेवा देण्यासाठी सॅनिटायझर, मास्कसह सर्व आवश्‍यक खबरदारी घेतली जात आहे, असे सलूनचालक सागर ननावरे यांनी सांगितले.

Saloon
मुळशी : उरवडे येथील कंपनीत आगीचे तांडव, 18 कामगारांचा मृत्यू

लॉकडउनच्या काळात आम्ही काही दिवस लोकांना होम सर्व्हिस दिली. परंतु त्यात अडचणी येत होत्या. प्रशासनाने आम्हाला दुकाने पुन्हा उघडण्याची परवानगी देऊन आमच्या उत्पन्नाचा मार्ग पुन्हा खुला केला आहे. सलून व पार्लर सुरु आहेत याचा आनंद आहे. गर्दी होऊ नये यासाठी ग्राहकांना वेळा देण्यात येत आहे.

- महेश खानापुरे, मॉडर्न फॅमिली सॅलॉन

ऑनलाइन मीटिंग, व्हिडिओ कॉल्स यामुळे आयटी क्षेत्रात स्वतःला सतत प्रेझेंटेबल ठेवणे काळाची गरज झाली आहे. परंतु गेल्या दीड दोन महिन्यांपासून सलून बंद असल्यामुळे मला अनेक अडचणी येत होत्या. आज हेअर कट केल्यामुळे हलकं वाटतंय.

- गौरव दुधे, आयटी कर्मचारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.