Ambegaon News : मेंगडेवाडीत अंत्यविधी कार्यक्रमात जमलेल्या नागरिकांवर 'मधमाशांचा हल्ला' माशांनी जास्त चावा घेतल्याने पाच ते सहा जखमी

Ambegaon News : अंत्यविधीसाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला.
Bee stings injure four to five individuals in Ambegaon
Bee stings injure four to five individuals in Ambegaon sakal
Updated on

मेंगडेवाडी : ता.आंबेगाव येथे आज शनिवारी सकाळी दहा वाजता यामध्ये चार ते पाच जणांना मधमाशांनी जास्त प्रमाणात चावा घेतल्याने त्यांच्यावर निरगुडसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मेंगडेवाडी येथील काशिनाथ बबन मेंगडे (वय वर्ष ६८) यांचे आज शनिवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम मेंगडेवाडी येथील स्मशानभूमीत सकाळी दहा वाजता सुरू असताना अंत्यविधी प्रसंगी धुरामुळे झाडावर बसलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्या व त्यांनी जमलेल्या नागरिकांवर हल्ला केला.

Bee stings injure four to five individuals in Ambegaon
Wildlife Sanctuary : देशातलं पहिलं मानवनिर्मित अभयारण्य माहितीये? हरिण-काळविटांचं आहे 'माहेरघर'

त्यावेळी एकच गोंधळ उडून नागरिक सैरावैरा पळू लागले. यात अनेक नागरिकांना मधमाशांनी चावा घेतला असून जास्त प्रमाणात चावा घेतलेल्या नागरिकांवर निरगुडसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यामध्ये वैभव कैलास मेंगडे (वय २८ वर्ष ), विठ्ठल रामभाऊ मेंगडे (वय ८५ वर्ष), प्रणय ज्ञानेश्वर मेंगडे (वय २३ वर्ष), अक्षय नामदेव मेंगडे (वय २७ वर्ष), सुभाष पंढरीनाथ कुरकुटे (वय ५२ वर्ष) यांच्यावर निरगुडसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.