पुणे : ‘कृषिपंप वीजजोडणी’चा लाभ

योजनेमध्ये १ लाख ६४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग
Agriculture-Pump
Agriculture-Pumpsakal
Updated on

पुणे : कृषिपंपाच्या वीजबिलांतून थकबाकीमुक्त होण्यासाठी महावितरणकडून सुरू करण्यात आलेल्या ‘कृषिपंप वीजजोडणी धोरणा’चा लाभ पुणे जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी घेतला आहे, तर त्यापैकी ४३ हजार ३७८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत वीजबिल कोरे केले आहे. या सवलत योजनेची मुदत ३१ मार्चला संपुष्टात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील ३ लाख १४ हजार ११४ शेतकऱ्यांकडे एकूण ३ हजार १०१ कोटी ६२ लाख रुपयांची एकूण थकबाकी होती. महावितरणकडून व्याज व दंड माफी आणि वीजबिल दुरुस्तीनंतर समायोजनेतून या शेतकऱ्यांकडे आता २ हजार ३१० कोटी ७६ लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या ३१ मार्चपर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकी म्हणजे १ हजार १५५ कोटी ३८ लाख रुपये माफ होणार आहे व वीजबिलदेखील कोरे होणार आहे.आतापर्यंत १ लाख ६४ हजार २२० शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी ३३७ कोटी ५७ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, तसेच विलंब आकार व व्याजातील सूट, अशी एकूण ४४० कोटी ५१ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ४३ हजार ३७८ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम असा एकूण १३० कोटी रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी ८६ कोटी १८ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे, असे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले.

विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर

कृषिपंपाच्या थकीत व चालू वीजबिलांच्या भरण्यामधून पुणे जिल्ह्याच्या ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रासाठी प्रत्येकी १३० कोटी २२ लाख असे एकूण २६० कोटी ४४ लाख रुपये कृषी आकस्मिक निधीमध्ये जमा झाले आहेत. या निधीमधून वीजयंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाचे कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ७ नवीन उपकेंद्र व ७ उपकेंद्राची क्षमतावाढ या निधीमधून प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यातील ७ नवीन उपकेंद्र व ४ उपकेंद्राच्या क्षमतावाढीचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. यासह जिल्ह्यात १०१ कोटी ४६ लाख रुपये खर्चाच्या १७९९ विविध कामांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे. कृषी आकस्मिक निधीमधून आतापर्यंत ४८ कोटी ३१ लाख रुपये खर्चाचे १६२५ कामे सुरू करण्याचा आदेश दिल्याचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.