मंचर : राज्य शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचा सन २०२२-२३उत्कृष्ट अभियंता पुरस्कार उत्तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रावबहादुर यशवंत पाटील यांना सार्वजानिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व बांधकाम खात्याच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर यांच्या हस्ते देण्यात आला.
प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मुंबई येथे अभियंता दिनानिमित्त शुक्रवारी (ता.१५) कार्यक्रम झाला. यावेळी रस्ते विभागाचे सचिव सदाशिव साळुंके, बांधकाम सचिव संजय दशपुते, स्नेहलता पाटील यांच्यासह मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता उपस्थित होते. पाटील सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सन २००० मध्ये अभियंता श्रेणी एक या पदावर रुजू झाले. सन २०१६ पासून कार्यकारी अभियंता या पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, मंचर उपजिल्हा रुग्णालय, आदिवासी आश्रम शाळा, वस्तीगृह बांधकाम, भीमाशंकर विकास आराखडा, डिंभे येथील भीमाशंकर उद्यान, लाखनगाव, पारगाव, श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग, गंगापूर येथील पुलांची कामे,
जुन्नर तालुक्यातील शिवनेरी विकास आराखडा, ओतुर ग्रामीण रुग्णालय, खेड तालुक्यातील हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखडा , मावळतालुक्या अनेक कामे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री अंतर्गत पुणे जिल्ह्यातील अनेक रस्ते, ग्रामीण रुग्णालये, पुलांची कामे आदी महत्त्वाच्या प्रकल्पावर काम केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.