भीमाशंकर कारखान्याच्या पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरु

कारखान्याचे अध्यक्ष भगवान बेंडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
Bhimashankar sugar factory
Bhimashankar sugar factorySakal
Updated on

मंचर - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील संस्थापक अध्यक्ष असलेल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे.संचालक मंडळाच्या एकूण २१ जागांसाठी सोमवारी (ता.१३) व मंगळवारी (ता.१४) प्रत्येकी ७२ या प्रमाणे एकूण १४४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भगवान मल्हारराव बेंडे यांनी सोमवारी मंचर-महाळुंगे गटातून नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.

आंबेगाव व जुन्नरचे उपविभागीय अधिकारी सारंग कोडोलकर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. तहसीदार कार्यालय घोडेगाव (ता.आंबेगाव) येथे निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सन २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावाधीसाठी साठी संचालक मंडळ निवडले जाणार आहे.

“कारखान्याला राज्य व देश पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.एफ.आर.पी ची संपूर्ण देयके ऊस उत्पादकांना पहिल्याच हप्त्यात अदा करण्याची परंपरा भीमाशंकर कारखान्याने कायम ठेवली आहे.” अशी माहिती कारखान्याचे संचालक अँड. प्रदीप प्रतापराव वळसे पाटील यांनी दिली.

एकूण ११ हजार ७०० मतदार आहेत. १९९९ पासून वित्त विभाग प्रमुख या पदावर असलेले चंद्रकांत ढगे हे २०१५ पासून कार्यकारी संचालक आहेत. सध्याच्या संचालक मंडळात सर्वात तरुण संचालक अँड. प्रदीप वळसे पाटील असून जेष्ठ संचालक कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे आहेत.

“भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत. ता.३१ मार्च १९९४ रोजी कारखान्याची नोंदणी झाल्यानंतर शासन नियुक्त पहिले संचालक मंडळ अस्तित्वात आले. फेब्रुवारी २००० मध्ये पहिली संचालक मंडळ निवडणूक झाली. पहिला गळीत हंगाम ता.१४ डिसेंबर २००० रोजी झाला.आत्तापर्यंत कारखान्याने ऊस उत्पादकांना योग्य बाजारभाव दिला. एकरी ऊस उत्पादन वाढीसाठी विविध उपक्रमांची प्रभावीपणे अमलबजावणी केली आहे. सध्या होणारी संचालक मंडळाची निवडणूक पाचवी आहे. शुक्रवार (ता.१७) दुपारी तीन पर्यंत नामनिर्देशन अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()