आंबेठाण : खेड तालुक्यातील पश्चिम भागात सतत कोसळत असणाऱ्या पावसाने भामा आसखेड ( ता. खेड ) धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून धरणातून विसर्ग वाढविण्यात आला आहे. हा विसर्ग आज सकाळी ( दि.२७ ) ११ वाजल्या पासून ३६१६ क्युसेकवरून वाढवून ६९७९ क्युसेक एवढा करण्यात आला आहे.