कात्रज, ता. २६ : मागील रविवारी शहरात झालेला अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागल्याच्या घटनेनेनंतर भारती विद्यापीठ पोलिस अॅक्शन मोडवर आले आहे. त्यांनी रात्री नियमबाह्य व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यास सुरवात केली आहे.
मागील दोन दिवसात एकूण १२ कारवाया करण्यात आल्या असून रात्री साडे अकरापर्यंत हॉटेल, हातगाडी व अन्य व्यवसाय तसेच बार चालकांना दीड वाजेपर्यंत वेळ मर्यादा घालून दिलेली आहे. मात्र, रात्री नियमबाह्य वेळेत सुरू असणाऱ्यांवर भारती विद्यापीठ पोलिसांनी कारवाई केली आहे. तर, भारती विद्यापीठ वाहतूक विभागाकडूनही मद्यपान करुन गाडी चालविणाऱ्यांवर ड्रंक आणि ड्राइव्हच्या कारवाया करण्यात येत आहेत.
त्यामुळे अवैधरित्या व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या परिसरात काही हॉटेल व हातगाडीवाले रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तसेच, काही व्यावसायिकांना नोटिसा देखील बजवण्यात आल्या असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांकडून देण्यात आली आहे.
भारती विद्यापीठ परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्हेज-नॉन व्हेज हॉटेलचालक, बारचालक यांच्या बैठका घेऊन कायदा व नियमांची माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले आहे. तसेच, हॉटेल चालकांच्याही बैठका घेण्यात आल्या आहेत. नियम मोडणाऱ्या हॉटेल व बारचालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
बार व्यावसायिकांना रात्री दीड वाजेपर्यंत वेळ असून त्या ठिकाणी अल्पवयीन तरुण-तरुणी दारू पिणार नाहीत. याची खबरदारी घ्यावी. ड्रंक अँड ड्राइव्हसाठी नाकाबंदी सुरू असून धडक कारवाई केली जात आहे. पालकांनी आपल्या पाल्याकडे विना लायसन्स वाहने देऊ नयेत. असे आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे - दशरथ पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.