Viral Video: पुणेकरांचा लाडका Z ब्रिज देखील पाण्याखाली जाणार? पावसाचे रौद्ररूप! व्हिडीओच्या माध्यमातून पाहा कुठं काय घडलं?

Pune Rain Update: अशात राज्यातील विविध ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत.
Bhide Bridge Pune Viral Video
Bhide Bridge Pune Viral VideoEsakal
Updated on

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यासह मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि कोकण परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. काही ठिकाणी जीवीत हाणीही झाली आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे.

अशात राज्यातील विविध ठिकाणी पावसामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत.

दरम्यान पुणे आणि परिसरात दोन दिवसांपासून विक्रमी पाऊस झाला असून, खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येते आहे. यामुळे डेक्कन परिसरातील भीडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून तेथिल वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

दुसरीकडे या पावसाचा सिंहगड रस्ता परिसरालाही मोठा फटका बसला असून येथिल अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. नदी काठी असलेल्या अनेक सोसायट्यांमध्ये कंबरेपर्यंत पाणी शिरले आहे. अशा परिस्थितीतही लोक कामासाठी घराबाहेर पडत आहे.

दरम्यान या परिसरातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायर होत आहे. ज्यामुळे कंबरेपर्यंत असलेल्या पाण्यातून वाट काढत लोक बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

Bhide Bridge Pune Viral Video
Pune Offices Closed: पुणेकरांसाठी मोठी बातमी! पावसामुळे शाळांच्या पाठोपाठ ऑफिससुद्धा राहणार बंद, जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली सुट्टी

सतत सुरु असलेल्या या पावसाचा हिंगणे खुर्द परिसरालाही मोठा फटका बसला आहे. येथिल साई नगरमध्ये डोंगरमाथ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून येत नागरी वस्तीत शिरत आहे. त्यामुळे या परिसरातील अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. या नागरिकांची सुटका करण्यासाठी आता अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झाले आहे.

Bhide Bridge Pune Viral Video
Raigad Schools Closed: राज्याला पावसाचा दणका! पुण्यानंतर 'या' जिल्ह्यातील शाळांनाही जाहीर झाली सुट्टी

या पावसाच्या परिस्थितीत उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने पुणे, पिंपरी-चिंचवड, भोर, मुळशी आणि परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

दुसरीकडे लोणावळ्यात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने स्थानिक प्रशासनाने शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.