पुणे - बुधवार पेठेतील भिडे वाड्यात महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली या ठिकाणी स्मारक करावे ही मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात असताना न्यायालयातील वादामुळे त्यावर निर्णय घेता येत नव्हता. अशा स्थितीत हा वाडा खिळखळा होऊन भग्न अवस्थेमध्ये विनावापर पडून आहे. हा वाडा पुणे महापालिकेच्या ताब्यात मिळावा आणि तेथे राष्ट्रीय स्मारक करावे यासाठी अनेक वर्ष प्रयत्न सुरू होते.
अखेर त्यास महापालिकेला यश मिळाले. १३ वर्ष न्यायालयामध्ये यासाठी लढा सुरू होता. जवळपास ८० सुनावण्या झाल्या त्यानंतर उच्च न्यायालयात हा मोठा विजय महापालिका झालेला आहे. महापालिकेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यानंतर ही जागा त्वरित ताब्यात मिळेल असे महापालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
पुण्यातील २५७ बुधवार पेठ येथील ऐतिहासिक वास्तू आहे. या वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ साली भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. यात शिक्षण देण्याचं काम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी केले होते. गेल्या अनेक वर्षापासून भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक व्हावे अशी मागणी केली जात होती.
त्यामुळे पुणे महापालिकेने भिडेवाडा ताब्यात घेऊन तेथे राष्ट्रीय स्मारक करावा असा ठराव फेब्रुवारी २००६ मध्ये मुख्यसभेत केला. त्यानंतर जानेवारी २००८ मध्ये स्थायी समितीने त्यास मान्यता देऊन भूसंपादनाद्वारे ही जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
महापालिकेने यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू करून ३२७ चौरस मीटर जागेसाठी १ कोटी ३० लाख रुपये मोबदला देण्यासाठी ही रक्कम भूसंपादन विभागाकडे भरली होती. ही जागा पुणे मर्चंट को-ऑपरेटिव बँकेची असून तिथे २४ भाडेकरु होते.
त्यांच्यातर्फे महापालिकेच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली असल्याबाबत कोणताही सबळ पुरावा नसल्याने स्थायी समिती व मुख्य सभा ठराव रद्द करण्यात यावे.
त्याअनुषंगाने कलम ४ व कलम ६ चे नोटीफिकेशन रद्द करण्यात यावे. तसेच पुणे महानगरपालिकेने जादा एफएसआय मान्य करावा. जेणेकरून टेरेसवर एक हॉल बांधता येईल अशा मागण्या केल्या होत्या.
पुणे महापालिकेसह राज्य सरकारने भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू झाली हे पूराव्यानिशी मांडले आणि हा निकाल महापालिकेच्या बाजूने देण्याची विनंती केली. त्या अखेर यश आले. आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनवणीमध्ये भिडे वाड्याची जागा पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्याचे आदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल कमल खाटा यांनी दिले.
महापालिकेच्या विधीसल्लागार अॅड. नीशा चव्हाण म्हणाल्या, 'भिडे वाड्याचा निकाल उच्च न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने दिला आहे. आजचा निर्णय आमच्यासाठी अभिमानाचा आहे. भिडे वाड्याची जागा ताब्यात घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांमार्फक प्रक्रिया सुरू केली जाईल.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.