Bhide Wada : भिडे वाडा स्मारकासाठी चार आराखडे दाखल

बुधवार पेठेतील भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकासाठी नवीन वास्तू उभारली जाणार आहे. याची उभारणी जुन्या वाड्याप्रमाणे करून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal
Updated on

पुणे - बुधवार पेठेतील भिडे वाड्याच्या ठिकाणी राष्ट्रीय स्मारकासाठी नवीन वास्तू उभारली जाणार आहे. याची उभारणी जुन्या वाड्याप्रमाणे करून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. महापालिकेकडे चार वास्तूविशारदांकडून आराखडा सादर केला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सादरीकरण केल्यानंतर अंतिम आराखडा निश्‍चित होणार आहे.

पुणे महापालिकेने भिडे वाड्याची जागा ताब्यात घेतली आहे. येथे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी स्मारक उभारले जाणार आहे. फुले दांपत्यांच्या क्रांतिकारक निर्णयामुळे देशात महिलांच्या आयुष्यातील अज्ञानाचा अंधार दूर होऊन शिक्षणाने त्या स्वयंप्रकाशित झाल्या. त्यांच्या महान कार्याचा सन्मान करण्यासाठी त्या दर्जाचे स्मारक उभारले जाणार आहे.

यासाठी महापालिकेने पाच वास्तूविशारदांना भिडे वाड्याच्या पुनर्निर्माण करण्यासाठी आराखडे सादर करण्याची सूचना केली होती. त्यापैकी चार जणांनी आराखडे सादर केले आहेत. यासंदर्भात एक बैठक अधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यामध्ये फुले दांपत्यांचे सामाजिक कार्य, त्या काळजी भिडे वाड्यातील शाळा, त्याचे महत्त्व याचे प्रत्यंतर त्या आराखड्यात होणे आवश्‍यक आहे.

या ठिकाणी पर्यटक भेट देण्यासाठी गेल्यानंतर त्यांना १८४८ मधील भिडे वाड्याच्या शाळेत आल्या सारखे वाटले पाहिजे यादृष्टीने अंतर्गत रचना व इमारतीचे बांधकाम आवश्‍यक आहे. इमारतीवर मेघडंबरी असली पाहिजे यासह इतर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार सुधारित आराखडा तयार केला जात आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे लवकरच सादरीकरण केले जाईल, तेथे येणाऱ्या सूचनानुसार बदल करून एक आराखडा अंतिम केला जाईल, अशी माहिती भवन विभागाच्या प्रमुख हर्षदा शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.