Bhide Wada : भिडेवाड्यासाठी राज्य सरकारने केली ५० कोटीची तरतूद

पुणे महापालिकेने भिडेवाड्याची जागा ताब्यात घेतल्यानंतर तेथे नवीन वास्तू उभारण्यासाठी वास्तूविशारदांकडून आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
Bhide Wada demolished
Bhide Wada demolishedsakal
Updated on

पुणे - महापालिकेने भिडेवाड्याची जागा ताब्यात घेतल्यानंतर तेथे नवीन वास्तू उभारण्यासाठी वास्तूविशारदांकडून आराखडा अंतिम करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान, या वाड्याच्या कामासाठी राज्य सरकारने ५० कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. निधी उपलब्धतेमुळे या वाड्याचे काम वेळेत सुरु होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने १३ वर्षाच्या लढ्यानंतर भिडेवाड्याची जागा ताब्यात घेण्यास यश मिळवले. दोन दिवसांपूर्वी रात्री हा वाडा ताब्यात घेताना धोकादायक झालेली इमारत पाडून टाकण्यात आली आहे. याठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये देशातील मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. त्यास अभिवादन करण्यासाठी राष्ट्रीय स्मारक उभे केले जाणार आहे.

महापालिकेला या स्मारकासाठी ३ हजार चौरस फुटाची जागा उपलब्ध झाली आहे. तेथे तीन मजल्यांमध्ये स्मारक उभे केले जाणार आहे. यात वर्गखोल्या, संग्रहालय, अभ्यासिका, छोटे सभागृह, कॅफेटेरियायासह इतर गोष्टींचा समावेश असेल. महापालिकेने पाच वास्तूविशारदांकडून आराखडे मागविले असून, त्यापैकी चार आराखडे सादर झाले आहेत.

त्यावर आज अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्याकडे प्राथमिक चर्चा झाली आहे. आयुक्तांकडे सर्व आराखड्यावर चर्चा झाल्यानंतर त्यातून एक आराखडा निश्‍चित करून या पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार या स्मारकाचे निर्माण करण्यासाठी सुमारे १० कोटी रुपये खर्च येईल. पण त्यास ऐतिहासिक रुप व अत्याधुनिक साधनांचा वापर करून भिडे वाड्याची सजावट केल्यास हा खर्च आणखी वाढू शकणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने केलेली ५० कोटीची तरतूद पुरेशी ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.