Bhima River : भीमा नदीने दौंड येथे ओलांडली धोक्याची पातळी

दौंड शहरातील भीमा नदी पात्राने ५०५ मीटर ही धोक्याची पातळी दुपारी ओलांडली आहे.
Bhima River flood water in daund city
Bhima River flood water in daund citysakal
Updated on

दौंड - दौंड शहरातील भीमा नदी पात्राने ५०५ मीटर ही धोक्याची पातळी दुपारी ओलांडली आहे. भीमा नदीच्या पाण्याचा विसर्ग सकाळी आठ वाजता १ लाख ४० हजार ६२१ क्युसेक तर सायंकाळी पाच वाजता २ लाख ०६ हजार ९७२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दौंड येथून भीमा नदी पात्रातील या पाण्याचा प्रवाह अष्टविनायक पैकी एक अशा श्री क्षेत्र सिध्दटेक ( जि. नगर) मार्गे उजनी (जि. सोलापूर) धरणाकडे जातो.

खडकवासला साखळीतील धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यानंतर आणि ४ ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणावर खडकवासला साखळीतील धरणांमधून भीमा नदी पात्रात केला जाणारा विसर्ग वाढविल्याने ५ ऑगस्ट रोजी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. दौंड तालुक्यातून वाहणार्या मुळा , मुठा व भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, अशी माहिती तहसीलदार अरूण शेलार यांनी दिली. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदी पात्रातील कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

दौंड शहरासाठी इशारा पूर पातळी ही ५०४ मीटर ( १५७४८५ क्यूसेक) असून धोक्याची पूर पातळी ५०५ ( १५८२६४ क्यूसेक ) मीटर आहे. दौंड शहरातील भीमा नदी पात्रातील विसर्ग आज (ता. ५) सकाळी आठ वाजता १ लाख ४० हजार ६२१ क्युसेक, सकाळी दहा वाजता १ लाख ४९ हजार ४४३ , दुपारी बारा वाजता १ लाख ५८ हजार २६४ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता. दुपारी तीन वाजता १ लाख ६१ हजार ७९३ तर सायंकाळी पाच वाजता २ लाख ०६ हजार ९७२ क्युसेक वेगाने विसर्ग सुरू होता, अशी माहिती जलसंपदाचे शाखाधिकारी विशाल गोडसे यांनी दिली.

दौंड शहरातील पानसरे वस्ती कडून भीमा नदी पात्राकडे जाणार्या रस्त्यालगत सखल भागात पुराचे पाणी आल्याने रस्त्यावर कमरेएवढे सांडपाण्यासह नदीचे पाणी जमा झाले आहे. नदीकाठाजवळ असलेल्या केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयाकडे जाणार्या रस्त्यावर देखील पाणी जमा झाले आहे. भीमा नदीची पातळी वाढल्याने पाणी पाहण्यासाठी नागरिक नदीकाठावर गर्दी करीत असल्याने प्रशासनाने गाववेशीपासून श्री कुंडलिक महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता अडथळे उभारून बंद केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.