Ambegaon News : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याकडून बिबट्याच्या नसबंदी बाबत, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल..

Ambegaon News : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळ सभेत घेतलेल्या निर्णयानुसार, मुंबई उच्च न्यायालयात बिबट्या नसबंदी जनहित याचिका दाखल केली आहे.
bhimashankar cooperative sugar factory in pargav files public interest petition for leopard sterilization
leopard sterilizationsakal
Updated on

पारगाव: आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने राज्याचे सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक-संचालक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सभेत घेतलेल्या निर्णयानुसार व वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जाहीर केल्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात बिबट्या नसबंदी जनहित याचिका दाखल केली असल्याची माहीती कारखान्याचे अध्यक्ष ळासाहेब बेंडे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना श्री.बेंडे म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्र आंबेगाव, शिरूर व परिसरात सध्या ऊस क्षेत्र भरपूर प्रमाणात वाढलेले असल्याने बिबट्यांना वास्तव्यास उपयुक्त जागा झालेली आहे. बिबट्या वन्य प्राणी असून पाळीव प्राणी व जनावरे त्याचे मुख्य भक्ष्य आहे.

सद्या बिबट्यांची संख्या वाढल्याने हल्ले करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली असून भक्ष्याच्या शोधात मानवी वस्तीवर येवू लागले आहेत.

पाळीव प्राण्याबरोबरच ते लहान मुले, महिला व पुरुषांवर हल्ले करू लागल्याने हल्ल्यांमध्ये जखमी तसेच मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. मनुष्य व पाळीव प्राणी यांचेवर होणारे हल्ले रोखण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी तसेच बिबट्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना म्हणून शासनामार्फत बिबट्याची नसबंदी करणे गरजेचे आहे.

बिबट्याची नसबंदी करणेकरीता उच्च न्यायालय, मुंबई येथे अॅड. तेजस देशमुख यांचे मार्फत भिमाशंकर कारखान्याच्या वतीने जनहित याचिका दाखल केली आहे. बिबट्या नसबंदी शासनामार्फत केल्यास हल्ले रोखण्यासाठी सर्वोतोपरी मदत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.