Bhimashankar News : मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये सव्वा लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे घेतले दर्शन

गेले दोन तीन दिवसांपासुन भीमाशंकर व परिसरामध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडत आहे. चौथ्या सोमवारची गर्दी पाहता शनिवार व रविवार गर्दी मोठ्या प्रमाणात होती.
Bhimashankar Shivling Darshan
Bhimashankar Shivling Darshansakal
Updated on

शिनोली - बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणार्‍या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी भाविकांनी हर हर महादेव, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत मुसळधार पाऊस व दाट धुक्यामध्ये सव्वा लाख भाविकांनी पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्री कृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे ह्या दिवशी सभामंडप व परिसरामध्ये आकर्षक विविध रंगीबेरंगी फुलांची करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.