Shravani Somvar: श्री क्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्याच श्रावण सोमवारी सुमारे पावणे दोन लाख भाविकांनी बम बम भोले, जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय अशा घोषणा देत पाऊस व दाट धुक्यामध्ये पवित्र अशा शिवलिंगाचे दर्शन घेतले. श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग आहे.
दरवर्षी संपुर्ण श्रावण महिन्यामध्ये पविञ शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक भक्त येत असतात.गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासुन ह्या भागामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी व पविञ अशा शिवलिंगाचे दर्शन असा दुहेरी योग जुळुण आला त्यामध्येच श्रावण महिन्याचा पहिला सोमवारी श्री क्षेञ भीमाशंकर येथे प्रचंड गर्दी पहावयास मिळाली.
भीमाशंकर परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सौंदर्य फुलले आहे यामुळे भीमाशंकरला येणारे भाविक पर्यटक हे डिंभे धरण, गोहे घाट, तसेच ठिक ठिकाणे थांबुन निसर्गाचा आनंद लुटत होते.
वाहतुकीला सोपे व्हावे यासाठी प्रशासनाकडुन पाच वाहनतळ ठेवण्यात आले होते. परंतू गर्दीचा ओघ बघता सर्व वहाने ही चौथ्या व पाचव्या थांब्याजवळ पार्क करण्यात आली होती. थांब्यापासुन भाविकांना बसस्थानकापर्यंत सोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या ८ मिनीबस व २२ मोठ्या बस ठेवण्यात आल्या होत्या.
यामुळे भाविकांना फार वेळ थांबावे लागत नव्हते. सहाय्यक वाहतुक निरिक्षक प्रशिक्षण पुणे मारुती खळदकर व सहाय्यक वाहतुक अधिक्षक तुकाराम पवळे हे वाहतुकीचे नियोजन करत होते. तसेच वाहनतळांवरती परिवहन मंडळाचे प्रशिक्षण विद्यार्थी वाहन पार्किंगचे नियोजन करत होते.
क्षेत्र भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. सुरेश कौदरे, भोरगिरी ग्रामपंचायतीचे सरपंच दत्ताञय हिले, विश्वस्त दत्तात्रय कौदरे, गोरक्ष कौदरे, व्यवस्थापक चंद्रकांत कौदरे मंदीरामध्ये थांबुन भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था व समस्या सोडविण्याचे काम करत होते.
मंचर भीमाशंकर रस्त्यावरील तळेघर राजपुर पालखेवाडी जवळील शनिमंदीर तसेच म्हातारबाचीवाडी व ठिक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडल्यामुळे पहिल्याच श्रावण सोमवारी भाविकांना धक्केबुक्के खातच दर्शनाला जावे लागले.
महावितरण कंपनीच्या अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे विजेचा मोठ्या प्रमाणात लपंडाव चालू होता तीन चार दिवसांपासुन सारखाच विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये अंधार पडला होता त्यामध्येच दाट असे धुके असल्यामुळे भाविकांना दर्शन बारी मध्ये चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचण होत होती.
या मध्येच मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाल्यामुळे पायरी मार्गावरून अक्षरशः भाविकांना येताना जाताना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.खेड पोलिस उपविभागिय अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलिस निरिक्षक तीन सहाय्यक पोलिस निरिक्षक व ११ पोलिस उपनिरिक्षक ११२ पुरुष पोलिस कर्मचारी व १५ महिला पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त नेमण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.