भोर - रविवारी (ता.५) तालुक्यातील तेरा ग्रामपंचायतिच्या निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज झाले असून सर्व मतदान केंद्रांवर कर्मचारी आणि मतदान साहित्य पोहोच झाले आहे. अशी माहिती तहसीलदार तथा मुख्य निवडणूक अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.
रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळी मध्ये तेरा मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेसाठी २१० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून ४२ पथके तयार करण्यात आली आहेत. मतदानासाठी ११ झोनल ऑफिसर आणि ११ सहाय्यक जोनाल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांच्या ३१ जागांसाठी ४६ उमेदवार रिंगणात आहेत.
तर सरपंच पदाच्या १३ जागांसाठी ४२ उमेदवार आहेत. तालुक्यातील निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे कंसात मतदारांची संख्या - दापकेघर (३२०), शिरवली हिमा (७६४), हिर्डोशी (६०५), वडतुंबी (१२५०), वरोडी ब्रु. (५२८), पळसोशी (८०३), वरोडी खुर्द (७३३), नाटंबी (८९४), करंजे (७०६), महुडे खुर्द (१२१०), जयतपाड (७४९), कांबरे ब्रु (४३२) आणि माळेगाव (६६५).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.