Varandha Ghat : नयनरम्य वरंधा घाट धोकादायक

जलधारा अंगावर झेलत पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणाचे पर्यटक भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटाला पसंती देतात.
Varandha Ghat
Varandha Ghatsakal
Updated on

भोर - जलधारा अंगावर झेलत पर्यटनाचा अनुभव घेण्यासाठी पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणाचे पर्यटक भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटाला पसंती देतात. मात्र, हा मनोहारी, निसर्गरम्य घाट निष्काळजीपणा केल्यास धोकादायक ठरू शकतो. हे मागील काही घटनांवरून अधोरेखित झाले आहे.

घाटातून जाताना दरडी कोसळणे, नागमोडी वळणार नियंत्रण सुटल्याने वाहन दरीत कोसळण्याची शक्यता असते. यामुळे नयनरम्य सौंदर्याचा आस्वाद घेताना खबरदारी घेण्याची आवाहन प्रशासनाकडून पर्यटकांना करण्यात येत आहे.

पर्यटकांनी भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटात होणारे जास्तीत जास्त अपघात हे वाहनचालकांच्या बेशिस्तीमुळे झाले आहेत. घाटातील काही ठिकाणची धोकादायक वळणे, रस्त्यांवरील संरक्षक कठडे नसल्यामुळे त्यात भर पडते.

सध्या पावसाचे प्रमाण कमी असले तरी या मार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आवश्‍यक आहे. घाटाचे सौंदर्य पाहताना घाटातील वेड्यावाकड्या वळणांवर वाहने काळजीपूर्वक चालवावी लागतात. काही जणांनी सूचना फलकांकडे दुर्लक्ष करत बेफिकिरीने वाहन चालविल्यामुळे मागील वर्षी अपघातांत वाढ झाली आहे.

भोरपासून वरंधा घाटातील वाघजाई मंदिरापर्यंत ४७ किलोमीटरचा रस्ता हा भोरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येतो. दरम्यान, केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी फाटा (ता.खंडाळा, जि.सातारा) ते वरंधा घाटापर्यंतच्या ५७.४५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी ७२३ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

  • ३५ किलोमीटर घाटाचे एकूण अंतर (निगुडघर गावापासून)

  • १२ किलोमीटर मुख्य घाट

अपघात होण्याची संभाव्या कारणे

  • वाहनचालकांकडून अतीवेगात वाहन चालविणे

  • घाटातील वळणे नागमोडी व वेडीवाकडी

  • दिशादर्शक फलकांकडे वाहनचालकांचे दुर्लक्ष

  • वळणावर नियंत्रण सुटून वाहने दरीत कोसळणे

  • वळणाचा अंदाज न आल्याने गटारात पलटी होणे

  • रस्त्यावरील चिखलाच्या राडारोड्यामुळे वाहन घसरणे

अपघात प्रवण ठिकाणे

  • वाघजाई मंदिर

  • उंबार्डे

  • शिरगाव

  • वारवंड

  • हिर्डोशी

  • कोंढरी

साडेसहा कोटी रुपये खर्चून घाटात केलेल्या सुविधा

  • अत्यंत धोकादायक ठिकाणची वळणे काढून संरक्षण कठडे बांधले

  • वळणांवर पांढरे पट्टे मारले, साईडपट्या भरून घेतल्या

  • आवश्यक त्या ठिकाणी लोखंडी कठडे उभे केले

  • भोरपासून वरंधा घाटातील वाघजाई मंदिरापर्यंत १५२ दिशादर्शक फलक

फलकांद्वारे मिळणाऱ्या सूचना

  • अपघात क्षेत्र

  • धोकादायक वळण

  • वेगमर्यादा

  • घाटातील दरड कोसळण्याची ठिकाणे

  • अत्यावश्यक सेवा क्रमांक

निगुडघरपासून वरंधा घाटापर्यंत अनेक नागमोडी वळणे आणि चढ-उतार आहेत. नीरा-देवघर धरणाच्या बॅकवॉटरचे निसर्गसौंदर्य आणि घाटातील हिरवाई यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघात होतात. पावसाळ्यामध्ये घाटातील रस्त्याच्या कडेला छोटेमोठे धबधबे सुरू होत असून, दरडी व झाडे कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात अधिक काळ रस्त्यांवर एका ठिकाणी थांबू नये आणि काळजीपूर्वक वाहने चालवावीत.

- संजय वागज, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, भोर.

अशा झाल्या दुर्घटना

- २०२२ - २०२३

अपघात - ७ - ७

जखमी - १० - १६

दरड कोसळली - ४ - १

मृत्यू - - - १

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com