Bhosari Constituency: भोसरी विधानसभा कुणाच्या पारड्यात? अजित गव्हाणेंची शरद पवार गटात एन्ट्री, ठाकरे गटाची चिंता का वाढली?

Ajit Gavane joins Sharad Pawar Party: अजित दादांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
Ajit Gavane joins ncp Sharad Pawar
Ajit Gavane joins ncp Sharad Pawar esakal
Updated on

पुण्यातील शिवसेना भवन येथे उद्या, ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक होणार आहे. पुणे लोकसभा, शिरूर लोकसभा, मावळ आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ही बैठक शिवसेना खासदार संजय राऊत आणि पुणे जिल्ह्याचे संपर्कप्रमुख सचिन अहिर यांच्या उपस्थितीत दुपारी चार वाजता होईल.

नाराज पदाधिकाऱ्यांमध्ये चिंता-

अजित दादांच्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटातील इच्छुक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. याच विषयी उद्या शिवसेना भवन येथे बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. बैठकीमध्ये नेत्यांकडून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि त्यानंतर सर्व नेते मातोश्रीवर भेट घेण्यासाठी जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

भोसरी मतदारसंघातील समस्या-

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील अजित गव्हाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची नाराजी वाढली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे.

Ajit Gavane joins ncp Sharad Pawar
Ajit Pawar: पुण्यात अजितदादांचा 'मोहरा' फुटणार? शरद पवारांचा सर्वात मोठा धक्का!

पदाधिकाऱ्यांच्या मागण्या-

सेना भवन येथे दुपारी चार वाजता संजय राऊत भोसरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेतील. भोसरी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीत मिळावा यासाठी पदाधिकारी आग्रही आहेत. शिवाय, अजित गव्हाणे जर भोसरीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील तर त्यांचा प्रचार करण्यास ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी नकार दिला आहे.

बैठक आणि पुढील दिशा-

या बैठकीत ठाकरे गटाच्या नेत्यांकडून नाराज पदाधिकाऱ्यांच्या समस्यांचा तोडगा काढण्याचा प्रयत्न होणार आहे. बैठकीनंतर सर्व नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतील आणि पुढील दिशा ठरवली जाईल.

Ajit Gavane joins ncp Sharad Pawar
Kangana Ranaut: बंड अन् विभाजन सामान्य गोष्ट, राजकारण करु नये तर गोलगप्पे विकावे का?; एकनाथ शिंदेंसाठी कंगना मैदानात!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com