भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक

भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक
Updated on

पिंपरी - भोसरी पीएमपी बस टर्मिनल परिसरातील अवघे पाच मिनिटे... सोमवार-सकाळी अकराची वेळ...चाकणकडे निघालेली पीएमपी बस...त्यातील प्रवासी ४० ते ४५...त्याच वेळी चाकणकडे निघालेल्या ऑटो रिक्षा पाच, पॅगो रिक्षा दोन, एक जीप व एक ओमिनी...एका रिक्षात किमान प्रवासी पाच, एका पॅगोतील प्रवासी ११, जीपमधील प्रवासी १३... ओमिनीतील प्रवासी १२ सर्व मिळून प्रवासी ७२...असे अवैध प्रवासी वाहतुकीचे चित्र भोसरीत दररोज बघायला मिळते. ठराविक वेळेनुसार सुटणाऱ्या पीएमपी बस आणि इच्छितस्थळी थांबणारे अवैध प्रवासी वाहन चालक यामुळे भोसरी-चाकण मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक सर्रास सुरू आहे. 

भोसरीतील पीएमटी चौक ते अंकुशराव लांडगे नाट्यगृहापर्यंतचा पुणे-नाशिक महामार्गावरील सेवा रस्त्याचा परिसर म्हणजे अतिशय गर्दीचा भाग. रोजंदारीने कामाला जाणारे अनेक मजूर तिथे सकाळी सातपासूनच उभे असतात. शिवाय अन्य प्रवाशांचीही गर्दी असते. याच ठिकाणी पीएमपीएमएलचे बस टर्मिनल आहे. येथून पुणे, पिंपरी, चिंचवड, हडसपर, कोथरूड, हिंजवडीसह ग्रामीण भागातील चाकणे, म्हाळुंगे, आंबेठाण मार्गावर बस त्यांच्या नियोजित वेळेनुसार सुटतात. मात्र, केव्हाही जा आणि प्रवास सुरू करा, असे साधन म्हणजे ऑटो रिक्षा, पॅगो रिक्षा, जीप, ओमिनी अशी वाहने. भरली की चालली ही त्यांची पद्धत आणि प्रवाशांची संख्या जास्त असल्याने अधिक वेळ थांबावे लागत नाही.

शिवाय, प्रवासी सांगेल त्या ठिकाणी खासगी वाहनचालक थांबत असल्याने अशा वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. एक बसस्थानकावर येऊन मार्गस्थ होईपर्यंतच्या वेळेत पाच-सहा खासगी वाहने भरून निघालेली असतात, असे चित्र सोमवारी भोसरीत बघायला मिळाले.

बांधकाम साइटवर रोजंदारीने कामावर जातो. बसने गेल्यास मोशीतील बनकरवस्ती येते उतरून पुढे चालत जावे लागते; पण रिक्षा, जीपवाले कामाच्या ठिकाणापासून जवळ उतरता येते.
- सिद्धप्पा कदम, बांधकाम मजूर

अवैध प्रवासी वाहतुकीस बंदी आहे. अशा वाहन चालकांवर नियमित कारवाई केली जाते. चाकण-भोसरी मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल.
- आनंद पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

अवैध प्रवासी वाहतुकीविरुद्ध वाहनचालक परवाना रद्द करणे, वाहन जप्त करून आरटीओच्या ताब्यात देणे, न्यायालयात खटले दाखल करणे अशाप्रकारे कार्यवाही केली जाते.
- नीलिमा जाधव, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.