Pune: मुळशीत प्रशासनाची जबरदस्त कारवाई, तब्बल इतके पब अन् बार केले जमीनदोस्त

Latest Mulshi News : या कारवाईत सुमारे २१ हजार १२४ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आले.
Pune
Punesakal
Updated on

Mulshi Latest Update: मुळशी तालुक्यातील अनधिकृत पब, बार अँड रेस्टॉरंटवर ‘पीएमआरडीए’ने गेले दोन दिवस सलग कारवाईची धडक मोहीम राबविली. पिरंगुट (ता. मुळशी) परिसरातील काल (ता. १८) सायबा बार, सोनाली रेस्टो बार, जिप्सी रेस्टो बार, अथर्व रेस्टो बार आदी चार अनधिकृत हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंटवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे कारवाई करून बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईत सुमारे २१ हजार १२४ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकाम पाडण्यात आले.

Pune
Mulshi Dam Water Level : मुळशी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ; ५ टक्‍के असलेला साठा झाला ४० टक्‍के

आज दुसऱ्या दिवशीही ‘पीएमआरडीए’ने आपला मोर्चा भूगाव व भुकूम भागात वळविला. येथील ड्रंक इन लेक, सँडल वूड, बनियार्ड ब्रिस्ट्रो, राजहंस रेस्टो अँड बार, टी टू बार, टॅप्स अँड टॉक्स अशा एकूण सहा अनधिकृत हॉटेल, पब, बार अँड रेस्टॉरंटची बांधकामे पाडण्यात आली.

या कारवाईत सुमारे २८ हजार ५५५ चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. पोकलेन, जेसीबी व मनुष्यबळाच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली.

Pune
#TrafficUpdates : पुणेकरांनो...'या' रस्त्यावर आहे सध्या वाहतूक कोंडी 

‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे, सहाय्यक आयुक्त दीपक सिंगला यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी अनिल दौंडे, तहसीलदार मनीषा तेलभाते व बजरंग चौगुले, अभियंता सुनील पोवार, अन्य अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, कोणीही अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन ‘पीएमआरडीए’च्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागातील अधिकाऱ्यांच्या वतीने या वेळी करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com