कल्याणीनगर अपघात प्रकरणात रोज नवे खुलासे समोर येत आहेत. अशातच आज एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर जे ब्ल़ सॅम्पल बदलण्यात आले होते ते आईचे असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज, ते बदललेलं ब्लड सॅम्पल अल्पवयीन आरोपीच्या आईचे असल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याणीनगरमधील पोर्श मोटार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी अटक केली. मुलाला वाचविण्यासाठी ससून रुग्णालयात आईने स्वत:च्या रक्ताचा नमुना दिल्याचे तपासात समोर आल्यानंतर तिला अटक करण्यात आली. तिला रविवारी (ता. २) न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आईने पोलिसांसमोर धक्कादायक कबुली दिली आहे. रक्त मीच दिलं होतं आणि माझा मुलगाच गाडी चालवत होता अशी कबुली शिवानी अग्रवाल यांनी दिली आहे. आरोपीच्या आईने दिलेल्या कबुलीनं खळबळ उडाली आहे.
तर अपघातानंतर रक्त बदलण्याचा निर्णय दोघांनी घेतल्याचं देखील शिवानी अग्रवालने कबुल केलं आहे. तर अपघात झाला त्यावेळी मुलगा कार चालवत होता अशी माहितीही तिने दिली आहे. गेल्या अनेक चौकशीदरम्यान अग्रवाल कुटुंब सहकार्य करत नसल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं. मात्र, आज आरोपीच्या आईने आज कबुली दिली आहे.
ससूनमध्ये दिलेल्या रक्ताचा नमुना अल्पवयीन आरोपीचा नव्हे, तर एका महिलेचा असल्याचे डीएनए चाचणीत समोर आले होते. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाने डॉ. पल्लवी सापळे यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती नेमली होती. या समितीने चौकशी करून वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर केला. त्यात शिवानी अग्रवालच्या रक्ताचा नमुना चाचणीसाठी पाठविल्याचे म्हटले आहे. दरम्यान, यापूर्वी पोलिसांनीही संशय आल्याने मुलाच्या रक्ताचा नमुना औंध सरकारी रुग्णालयात डीएनए चाचणीसाठी पाठविला होता. त्यावेळी ससून आणि औंध रुग्णालयातील नमुने एकमेकांशी जुळत नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.
याच प्रकरणात अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवाल यांची पुणे पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याच प्रकरणात दोन डॉक्टर आणि एका सफाई कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.
शिवानी विशाल अग्रवाल (वय ४९) असे अटक करण्यात केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. कल्याणीनगर येथील अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले होते. त्यावेळी अल्पवयीन आरोपीचे वडील आरोपी विशाल अग्रवालने ससूनमधील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरेशी संपर्क साधून मदत करण्याबाबत सांगितले. त्यानंतर डॉ. तावरेने शवागारामधील शिपाई अतुल घटकांबळेला निरोप दिला. घटकांबळेने डॉ. श्रीहरी हाळनोरला भेटून रक्त बदलण्याबाबत सांगितले. डॉ. तावरेच्या सांगण्यावरून डॉ. हाळनोरने मुलाच्या रक्ताच्या नमुन्याची सिरींज कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली. त्यानंतर त्याने शिवानी अग्रवालच्या रक्ताचे नमुने घेतल्याचे समोर आले आहे. ससूनमधील डॉ. तावरे, डॉ. हाळनोर आणि शिपाई घटकांबळेला यापूर्वीच अटक केली आहे. गुन्हे शाखेने शिवानीला शनिवारी सकाळी वडगावशेरीतून ताब्यात घेतले. चौकशीनंतर तिला अटक करण्यात आली.
बुधावरी राज्य शासनाने ससून रुग्णालयाचे डीन विनायक काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. तपासामध्ये रोज नवनव्या लोकांच्या चौकशा होताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्यामुळे सगळा गदारोळ उडाला होता. याशिवाय, अल्पवयीन आरोपीचं म्हणून जे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं, ते आरोपीच्या आईचं होतं, अशाही बातम्या समोर आल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.