शरद पवार मोदींकडून अनेक गोष्टी करून घेऊ शकतात, मी त्यांच्यासोबत आहे; विनोद तावडे यांचं मोठं वक्तव्य

Vinod Tawde on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, भाजप नेते विनोद तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि विनोद तावडे एकाच मंचावर असल्याने ते काय बोलतील याकडे लक्ष लागलं होतं.
Vinod Tawde on Sharad Pawar
Vinod Tawde on Sharad Pawar
Updated on

पुणे- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर आधारित एका पुस्तकाचे प्रकाशन पुण्याच्या बालगंधर्व नाट्यगृहात पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, भाजप नेते विनोद तावडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. शरद पवार आणि विनोद तावडे एकाच मंचावर असल्याने ते काय बोलतील याकडे लक्ष लागलं होतं.

विनोद तावडे यांनी यावेळी बोलताना महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, पूर्वी महाराष्ट्राचं राजकारण प्रगल्भ होतं. आम्ही पू्र्वी टीका केली तर एकत्र जेवायला बसायचो. मात्र आता तसं चित्र दिसत नाही. मी विरोधीपक्ष नेता असताना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, पृथ्वीराज चव्हाण, तटकरे असतील या सर्वांवर सडेतोड टीका करायचो. पण, जेवणाच्या सुट्टीच्या वेळी विलासराव देशमुख यांची चिठ्ठी यायची माझ्याकडे जेवायला या. तटकरे माझ्या कॅबिनमध्ये जेवायला यायचे.

Vinod Tawde on Sharad Pawar
Sharad Pawar: "आम्ही सहकार्य करण्यास तयार पण..." मराठा आरक्षणावर पवारांनी स्पष्ट केली भूमिका

अण्णाभाऊ साठे यांच्यावरील पुस्तके इतर भाषेत भाषांतरित करण्याची गरज आहे. याची दखल भारताने घेतली पाहिजे. भारतरत्नाची जी जबाबदारी आहे ती शरद पवारांनी घेतली पाहिजे. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक कामे करून घेऊ शकतात. मी शरद पवारांसोबत असेल, असं भाजप नेते विनोद तावडे म्हणाले आहेत.

Vinod Tawde on Sharad Pawar
Ladki Bahin: आशीर्वाद द्या, नाहीतर 'लाडकी बहि‍णीं'चे 1,500 रुपये काढून घेऊ; रवी राणा यांचे धक्कादायक वक्तव्य

विनोद तावडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सध्याचे जे काही राजकारण सुरु आहे ते योग्य नाही अशा प्रकारची कबुलीच एकप्रकारे विनोद तावडे यांनी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवार यांनी यावेळी बोलताना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळाले पाहिजे असं वक्तव्य केलं. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळवून द्यायचं आहे, असं ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()