महायुतीचे सरकार आले तरच केंद्र आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना सुरू राहतील. उलट जेथे काँग्रेसचे सरकार येते तेथील योजना बंद पडतात हे जनतेला माहिती आहे.
पुणे : महाराष्ट्रात सध्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, आमच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी कोणालाही घाई नाही. जागा वाटपातही कोणाचाही आग्रह नाही. ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री ही भावना आहे, पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे त्यावरून निर्णय होतो, असे स्पष्ट भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केले.