Sinhagad Ghat : सिंहगड‌‌ घाटातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार? वन विभागानं घाटात केल्या 'अशा' उपाय योजना

सिंहगड घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन समितीच्या माध्यमातून मागील चार दिवसापासून नियोजन सुरू आहे.
Sinhagad Ghat
Sinhagad Ghatesakal
Updated on
Summary

गडावर झालेल्या या कोंडीबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी केली होती.

खडकवासला : पावसाळा सुरू झाला की, सिंहगडावर (Sinhagad Ghat) मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मागील शनिवार-रविवारी सोमवारी गर्दी वाढल्याने अभूतपूर्व वाहतूक (Traffic) कोंडी झाली होती. त्यानंतर, वन विभागाने (Forest Department) वन समिती वनसंरक्षण समितीच्या माध्यमातून वाहतूक टप्प्याटप्प्याने सोडण्यात येणार असून आज शनिवारी (ता. २२) त्याचा पहिला दिवस आहे.

गडावर झालेल्या या कोंडीबाबत ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध करून जिल्हा प्रशासनाने यात लक्ष घालण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी वनविभागाने यात वन समितीच्या (Forest Committee) माध्यमातून वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्याचा पहिला प्रयोग आज शनिवारी घाटात होणार आहे.

Sinhagad Ghat
Ganpatipule Temple : कोकणातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणार प्रचंड गर्दी; 'हे' आहे खास कारण

सिंहगड घाटातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वन समितीच्या माध्यमातून मागील चार दिवसापासून नियोजन सुरू आहे. टप्प्याटप्प्याने वाहतूक सोडण्याचा एक प्रयोग केला जाणार आहे. यासाठी नागरिक पर्यटक (Tourists) वाहन चालक, प्रवाशी जीप चालक, हॉटेल चालक यांनी वन समितीचे सुरक्षारक्षक यांच्या सूचनांचे पालन करावे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकार्य करावे.

-दीपक सकपाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी भांबुर्डा

Sinhagad Ghat
Monsoon Tourism : स्वर्गातील अद्भुत इंद्राचा दरबार अनुभवायचाय? मग, खेड-साताऱ्याला जोडणाऱ्या 'या' घाटाला जरुर भेट द्या

अशा असतील उपाय योजना

  • गडावर वाहनतळावर मुरुम टाकून क्षमता वाढवली

  • वाहनतळावर पट्टे मारून जागा निश्चिती केली

  • घाटातील राडाराडा उचलला

  • कोंढणपूर फाटा ते वाहन तळ अरुंद रस्ता

  • येथील कोंडी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने वाहतूक सोडणार

  • वॉकी टॉकीज यंत्रणेचा सक्षम वापरणार

  • सुरक्षारक्षकांना कोंडी टाळण्यासाठी सूचना

  • कामचुकार कर्मचाऱ्यांना कडक सूचना

  • जीप चालक हॉटेल चालक यांची बैठक

  • हॉटेल चालकांच्या वाहनांसाठी स्वतंत्र जागा

  • सुरक्षारक्षकांच्या सूचनांचे जीपचालकांना ही बंधन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.