कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पोटनिवडणुक मतदानाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आली आहे.(Big update regarding Pune Vidhan Sabha by election Kasaba Peth chinchwad )
27 फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची तारीख निवडणूक आयोगाने बदलली आहे. आता २६ फेब्रुवारी रोजी या दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक साठी मतदान पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाने हा निर्णय बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर घेतला आहे. पुणे जिल्हा निवडणूक आयोगाकडून पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघ यांच्याबद्दल एक अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवला होता.
या दोन्ही पोटनिवडणुकी दरम्यान बारावीच्या परीक्षा आहेत असे आहवलात नमूद केले होते. या गोष्टीची दखल घेतल्यानंतर आयोगाने चिंचवड आणि कसबा पेठ निवडणुकीच्या साठी होणाऱ्या मतदानाच्या तारखा बदलल्या आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सह इतर राज्यात देखील होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या तारखा काही दिवसांपूर्वी जाहीर केल्या होत्या. निकालांच्या तारखांमध्ये कुठल्याही बदल नसल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.