देवेंद्र फडणवीसांसोबतची बैठक निष्फळ, तुतारी हाती घेण्याचं बड्या नेत्यानं केलं निश्चित, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरु

Harshvardhan patil will join sharad pawar NCP: भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची हर्षवर्धन पाटलांची बैठक निष्फळ ठरली आहे.
devendra Fadnavis
devendra Fadnavis
Updated on

Pune Politics: पश्चिम महाराष्ट्रात भाजपला सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे हाती तुतारी घेण्याचे निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची हर्षवर्धन पाटलांची बैठक निष्फळ ठरली आहे.

शरद पवारांनी भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे. गेला काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चा होत्या. येत्या दोन ते तीन दिवसात हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यात पक्षप्रवेश होण्याचे दाट शक्यता आहे.

devendra Fadnavis
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! महायुती की महाविकास आघाडी? 2-3 दिवसांत घेणार अंतिम निर्णय

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला राम राम करण्याचं ठरवलं आहे.ते लवकरच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याने इंदापूर शहरात कार्यकर्त्यांची घोषणाबाजी केली.ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पाहायला मिळत आहे.

devendra Fadnavis
Harshvardhan Patil: 'इचलकरंजी म्हणजे पाकव्याप्त काश्मीर' म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना माज आलाय, विरोधकांची टीका

हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. सध्या अजित पवार गट महायुतीमध्ये असल्याने इंदापूरची समीकरणं बदलली आहेत. याठिकाणी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. विद्यमान आमदार असल्याने राष्ट्रवादीकडून तेच महायुतीचे उमेदवार असण्याचे जवळपास निश्चित आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांना संधी मिळणार नव्हती.

भाजपमध्ये राहिल्यास हर्षवर्धन पाटील हे इंदापूरमधून निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करून इंदापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्व घडामोडींमुळे इंदापूरमधील राजकीय वातावरण तापलं आहे. येत्या काही दिवसात मतदारसंघातील चित्र स्पष्ट होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.