बस, कारच्या विम्याच्या नावाने काढला दुचाकीचा विमा; कोट्यवधी रुपयांची फसवणूक

भविष्यात आपल्या कारला अपघात होऊन मोठा आर्थिक फटका बसू नये, यासाठी नागरीकांनी मोठ्या विश्‍वासाने विमा एजंटांना पैसे देऊन त्यांच्याकडील कारचा विमा उतरविला.
Car Insurance
Car Insuranceesakal
Updated on
Summary

भविष्यात आपल्या कारला अपघात होऊन मोठा आर्थिक फटका बसू नये, यासाठी नागरीकांनी मोठ्या विश्‍वासाने विमा एजंटांना पैसे देऊन त्यांच्याकडील कारचा विमा उतरविला.

पुणे - भविष्यात आपल्या कारला अपघात होऊन मोठा आर्थिक फटका बसू नये, यासाठी नागरीकांनी मोठ्या विश्‍वासाने विमा एजंटांना पैसे देऊन त्यांच्याकडील कारचा विमा उतरविला, मात्र विम्याच्या कागदपत्रांमधील बारकाव्यांचा गैरफायदा घेत एका विमा एजंटाने तीन चाकी, चारचाकी वाहने हि दुचाकी असल्याचे भासवून दुचाकीचा विमा काढत कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित एजंटाने एक, दोन नव्हे तर तब्बल 2 हजार 286 इतकी मोठी वाहने दुचाकी असल्याचे दाखवून विमा कंपनीची फसवणूक केली आहे.

अनंत कचरे याच्यासह इतरांविरूद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आयसीआयसी लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी स्वानंद जगदीश पंडीत (वय 41, रा. बंडगार्डन) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना एप्रिल 2021 ते ऑक्‍टोबर 2022 कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वानंद हे बंडगार्डन परिसरातील ढोले-पाटील रस्त्यावर असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनीमध्ये तपासणी अधिकारी आहेत. त्यांच्याकडे प्राप्त विमा पॉलिसी तपासताना त्यांनी एका दुचाकीचा क्रमांक पडताळून पाहिला. त्यावेळी संबंधित क्रमांक टेम्पोच्या नावाने नोंदणीकृत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी इन्शुरन्स कंपनी शासनाच्या वाहन पोर्टलवर माहिती काढली.

त्यावेळी संबंधित एजंटांनी अशाच पद्धतीने 2 हजार 286 मोठ्या वाहनांना दुचाकी असल्याचे भासवून विमा काढल्याचे उघडकीस आले. त्यासाठी संशयित आरोपींनी तीनचाकी, चारचाकी वाहन मालकांकडून त्याची रक्कम घेऊन प्रत्यक्षात मात्र दुचाकींचा विमा काढल्याचे निष्पन्न झाले. नागरिकांकडून कार व अन्य तीन, चारचाकी वाहनांचा इन्शुरन्स काढण्याची रक्कम घेत वाहनांचा संवर्ग बदलून दुचाकी असल्याचे भासवित फसवणूक केली.

वाहनमालक विम्याला मुकण्याची शक्‍यता

अपघातानंतर वाहनमालकांना वाहनांचे नुकसान आणि थर्ड पार्टी विमा संरक्षण दिले जाते. मात्र, एजंटाने कार व अन्य वाहनांऐवजी वाहनाचा प्रवर्ग बदलून तब्बल 2 हजार 286 इतक्‍या दुचाकींचे क्रमांक वापरून विमा कंपनीसह वाहन मालकांनाही गंडा घातला. त्यामुळे संबंधित वाहन मालकांना अधिकृत विमा मिळण्यास आता अडचणी निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.