पुणे - घनकचरा गाडीच्या धडकेने झाडाची फांदी अंगावर पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना हांडेवाडी रस्त्यावरील सातवनगर परिसरात घडली. या प्रकरणी महापालिकेच्या घनकचरा विभागातील ट्रकचालकासह उद्यान विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्याविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.